IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : फलंदाजांमुळे मुंबई इंडियन्सनं गमावला सलग दुसरा सामना; पंजाब किंग्सनं मोडली पराभवाची 'चेन'!

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : चेपॉकच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा कमी धावांचे लक्ष्य असूनही चुरस पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:01 PM2021-04-23T23:01:40+5:302021-04-23T23:05:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Punjab Kings defeats Mumbai Indians by 9 wickets | IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : फलंदाजांमुळे मुंबई इंडियन्सनं गमावला सलग दुसरा सामना; पंजाब किंग्सनं मोडली पराभवाची 'चेन'!

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : फलंदाजांमुळे मुंबई इंडियन्सनं गमावला सलग दुसरा सामना; पंजाब किंग्सनं मोडली पराभवाची 'चेन'!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : चेपॉकच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा कमी धावांचे लक्ष्य असूनही चुरस पाहायला मिळाली. अतिरिक्त फिरकी मिळत असलेल्या या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) गोलंदाजांनी दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) च्या फलंदाजांनी भक्कम भागीरादी करताना MIला पराभवाचा धक्का दिला. मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव ठरला. सलग तीन पराभवानंतर पंजाब किंग्सनं अखेर विजयाची चव चाखली. पंजाबनं ९ विकेट राखून हा सामना जिंकला. IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live Score Update

मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) सलामीवीर क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा अपयशी ठरला. इशान किशनची बॅट यंदा रुसलेली दिसतेय. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सूर्या ३३ ( २७ चेंडूं, ३ चौकार व १ षटकार) धावांवर माघारी परतला. रोहितसह त्यानं तिसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. १८व्या षटकात मोहम्मद शमीनं MIला मोठा धक्का देताना, रोहित शर्माला ६३( ५२ चेंडू, ५ चौकार व २ षटकार) धावांवर माघारी पाठवले. फॅबियन अॅलननं सीमारेषेनजीक त्याचा सुरेख झेल टिपला. मुंबईला २० षटकांत ६ बाद १३१ धावांवर समाधान मानावे लागले. MI Vs PBKS Live Score, IPL 2021 MI Vs PBKS, MI Vs PBKS Live Match  मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डवर चाहते भडकले; रडीचा डाव खेळण्याने खडेबोल सुनावले!

प्रत्युत्तरात पंजाब किंग्सला लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी दमदार सुरूवात करून दिली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये या दोघांनी ४६ धावा जोडल्या. लोकेश राहुलनं ट्वेंटी-२० दोनशे षटकार पूर्ण केले आणि पंजाब किंग्सकडून १००० धावा करणारा तो चौथा ( वृद्धीमान सहा, मनदीप सिंह व मयांक अग्रवाल) फलंदाज ठरला. ८व्या षटकात राहुल चहरनं MIला पहिली विकेट मिळवून दिली. मयांक २५ ( २० चेंडू) धावांवर बाद झाला अन् पहिल्या विकेटची ५३ धावांची भागीदारीही तुटली. आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहविरुद्ध १०० धावा करणाऱ्या फलंदाजांत लोकेश राहुलनं एन्ट्री घेतली. विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांच्यानंतर तो तिसरा फलंदाज ठरला. ( KL Rahul only 3rd Player after Kohli, ABD to Score 100 runs against Bumrah in IPL) रोहित शर्मा चूकला, पण IPLमध्ये मोठा पराक्रम केला; सलामीवीर म्हणूनही हिट ठरला!

लोकेशनं त्यानंतर ख्रिस गेलसह पंजाबचा डाव सावरला. मुंबईच्या गोलंदाज धावांची गती कमी करत होते, परंतु त्यांना विकेट घेण्यात अपयश आले. चेपॉकच्या खेळपट्टीवर चेंडू अपेक्षेपेक्षा अधिक फिरकी घेताना दिसला, त्यामुळं पंजाबच्या फलंदाजांवरही हाताशी विकेट असूनही दडपण निर्माण झाले होते. गेल व लोकेश यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लोकेशनं ५० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. क्षेत्ररक्षणातल्या चुकाही मुंबई इंडियन्सला महागात पडल्या. जसप्रीत बुमराह व राहुल चहर यांनी हातचा चौकार दिला. १८ चेंडूंत १७ धावांची गरज असताना गेलनं १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ट्रेंट बोल्टचे स्वागत केले.IPL 2021 latest news, MI Vs PBKS IPL Matches, MI Vs PBKS IPL match 2021, MI Vs PBKS T20 Match, रोहित शर्मा पहिल्याच षटकात भडकला, २००व्या डावात नको ते करून बसला,Video 

पंजाब किंग्सनं १७.४ षटकांत १ बाद १३२ धावा करून विजय मिळवला. लोकेश राहुल ५२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांवर, तर गेल ३५ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर नाबाद राहिला. राहुल चहरनं ४ षटकांत १९ धावांत १ विकेट घेतली. जयंत यादवनं ४ षटकांत २० धावा दिल्या. 
 

Web Title: IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Punjab Kings defeats Mumbai Indians by 9 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.