IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : मुंबई की कोलकाता, सपोर्ट करावा तरी कुणाला?; आजचा सामना पाहण्यापूर्वी 'या' दोन तरूणी झाल्यात कन्फ्यूज!

IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : मुंबई इंडियन्स ( MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) हे ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 06:26 PM2021-04-13T18:26:13+5:302021-04-13T18:28:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : Most Confused IPLFans For Today's Encounter: Sanjana Ganesan & Sara Tendulkar | IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : मुंबई की कोलकाता, सपोर्ट करावा तरी कुणाला?; आजचा सामना पाहण्यापूर्वी 'या' दोन तरूणी झाल्यात कन्फ्यूज!

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : मुंबई की कोलकाता, सपोर्ट करावा तरी कुणाला?; आजचा सामना पाहण्यापूर्वी 'या' दोन तरूणी झाल्यात कन्फ्यूज!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : मुंबई इंडियन्स ( MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आज एकमेकांना भिडणार आहेत. Mumbai Indiansला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं उद्धाटनीय सामन्यात पराभूत केले आणि रोहित शर्माच्या संघानं पहिला सामना देवाला, ही परंपरा कायम राखली. दुसरीकडे इयॉन मॉर्गनच्या Kolkata Knight Riders नं सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवताना दमदार सुरूवात केली. या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे, परंतु दोन तरुणी नक्की कोणाला सपोर्ट करावा, यासाठी कन्फ्यूज झाल्या आहेत. ipl 2021 t20 MI Vs KKR live match score updates chennai

संजना गणेशनसारा तेंडुलकर
मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं मागच्या महिन्यात टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी लग्न केलं. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. ती कोलकाता नाईट रायडर्सची अँकर आहे आणि त्यामुळे आज ती KKRला सपोर्ट करेल की MIला याची सर्वांना उत्सुकता आहे. IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update


सारा तेंडुलकरचं नाव भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्याशी अनेकदा जोडले गेले आहे. सोशल मीडियावरील ही दोघं एकमेकांच्या फोटोवर लाईक्स व कमेंट्सही करत असतात, त्यामुळे त्यांच्यातील प्रेमाच्या चर्चा रंगल्या. आता सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा अ‌ॅम्बेसिडर आहे, अशात सारा KKRचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शुबमन गिलसाठी चिअर करते की MIसाठी हाही चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : Most Confused IPLFans For Today's Encounter: Sanjana Ganesan & Sara Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.