IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : रोहित शर्माला धावबाद करण्याची चूक भोवली, ४९ धावा करूनही उचलबांगडी झाली; जाणून घ्या Playing XI 

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्स- पंजाब किंग्स यांच्यातील हाय स्कोरींग सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:07 PM2021-04-13T19:07:09+5:302021-04-13T19:10:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : KKR won the toss, Quinton De Kock in for Chris Lynn, Know Playing XI  | IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : रोहित शर्माला धावबाद करण्याची चूक भोवली, ४९ धावा करूनही उचलबांगडी झाली; जाणून घ्या Playing XI 

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : रोहित शर्माला धावबाद करण्याची चूक भोवली, ४९ धावा करूनही उचलबांगडी झाली; जाणून घ्या Playing XI 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्स- पंजाब किंग्स यांच्यातील हाय स्कोरींग सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. Mumbai Indians नं परंपरेनुसार पहिला सामना देवाला दान केल्यानंतर आजच्या सामन्यात त्यांच्याकडून चाहत्यांना विजय हवाच आहे. दुसरीकडे Kolkata Knight Riders विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Kolkata Knight Riders have won the toss and have opted to field)  मुंबई की कोलकाता, सपोर्ट करावा तरी कुणाला?; आजचा सामना पाहण्यापूर्वी 'या' दोन तरूणी झाल्यात कन्फ्यूज!


क्विंटन आला लीन गेला... 
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात क्विंटन डी कॉकचे आगमन झाले आहे. ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी त्यानं पूर्ण केला आहे. त्याच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात ख्रिस लीन ( Chris Lynn) रोहित शर्मासह सलामीला आला होता. लीननं MI कडून पदार्पणाच्या सामन्यात  ३४ चेंडूंत ४९ धावांची खेळी केली होती. पण, त्या सामन्यात त्याच्यामुळे कर्णधार रोहित धावबाद झाला होता.  क्विंटन आल्यानं लीनचा पत्ता कट होईल, हे निश्चित होते आणि ही भीती त्यानं पहिल्या सामन्यानंतरच व्यक्त केली होती.  IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update नाव बदललं, जर्सी बदलली, तरीही हा संघ हार्ट अटॅक देण्याचं काही थांबवत नाही; प्रीती झिंटा नाराज

Head-to-head records
मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत २७ सामने झालेत आणि मुंबई इंडियन्सनं २१ सामन्यांत विजय मिळवले आहेत.   ipl 2021 t20 MI Vs KKR live match score updates chennai
 
Kolkata Knight Riders: शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, वरुण चक्रवर्थी, प्रसिद्ध कृष्णा ( Kolkata Knight Riders: 1 Shubman Gill, 2 Nitish Rana, 3 Rahul Tripathi, 4 Andre Russell, 5 Eoin Morgan (capt), 6 Dinesh Karthik (wk), 7 Shakib Al Hasan, 8 Pat Cummins, 9 Prasidh Krishna, 10 Harbhajan Singh, 11 Varun Chakravarthy) 
Mumbai Indians: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जॅन्सेन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह ( Mumbai Indians: 1 Rohit Sharma (capt) 2 Quinton de Kock (wk), 3 Suryakumar Yadav, 4 Ishan Kishan, 5 Hardik Pandya, 6 Kieron Pollard, 7 Krunal Pandya, 8 Rahul Chahar, 9 Marco Jansen, 10 Trent Boult, 11 Jasprit Bumrah) 

Web Title: IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : KKR won the toss, Quinton De Kock in for Chris Lynn, Know Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.