IPL 2021, MI vs KKR, Live: रोहित परत आला रे! मुंबई इंडियन्सची फलंदाजी, हार्दिक पंड्या मात्र बाहेरच; कोलकाता सज्ज

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्याची नाणेफेक कोलकाता नाइट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:56 PM2021-09-23T18:56:04+5:302021-09-23T19:05:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs KKR Live Kolkata Knight Riders won the toss and elected bowl first rohit sharma come back in team | IPL 2021, MI vs KKR, Live: रोहित परत आला रे! मुंबई इंडियन्सची फलंदाजी, हार्दिक पंड्या मात्र बाहेरच; कोलकाता सज्ज

IPL 2021, MI vs KKR, Live: रोहित परत आला रे! मुंबई इंडियन्सची फलंदाजी, हार्दिक पंड्या मात्र बाहेरच; कोलकाता सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्याची नाणेफेक कोलकाता नाइट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे कर्णधार रोहित शर्माचं संघात पुनरागमन झालं आहे. मात्र, हार्दिक पंड्या आजच्या सामन्यातही खेळताना दिसणार नाही. कोलकाताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना किरकोळ दुखापतींमुळे चेन्नईविरुद्ध मुंबईने विश्रांती दिली होती. चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला होता. केआरविरुद्ध मात्र रोहित खेळणार असल्याचे सूतोवाच मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी केले होते.

दुसरीकडे केकेआरने आरसीबीवर नऊ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. ही कामगिरी कायम राखण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. गुणतालिकेत आठ गुणांसह चौथ्या स्थानी असलेल्या मुंबईने नेहमीसारखी संथ सुरुवात केली असली, तरी मुसंडी मारण्यात कसलीही कसर राखणार नाही, असा व्यवस्थापनाला विश्वास आहे. त्यासाठी चेन्नईविरुद्ध विजयी पाठलाग करताना झालेल्या चुका फलंदाजांना सुधाराव्याच लागतील. १५६ धावांचा पाठलाग करताना सौरभ तिवारीचा अपवाद वगळता अन्य फलंदाज कुचकामी ठरले होते.

 

मुंबई इंडियन्सचा संघ-


कोलकाता नाइट रायडर्सचा संघ-

Web Title: IPL 2021 MI vs KKR Live Kolkata Knight Riders won the toss and elected bowl first rohit sharma come back in team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.