IPL 2021, MI vs CSK, Highlights: चेन्नईच्या धावांचा डोंगर पोलार्डसमोर ठेगंणा, 'धोनी ब्रिगेड'चं नेमकं काय चुकलं?

IPL 2021, MI vs CSK, Highlights: आयपीएलमध्ये आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघानं चेन्नई सुपरकिंग्ज संघानं दिलेलं २१८ धावांचं आव्हान ४ विकेट्स राखून गाठलं आणि दमदार विजय साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:24 AM2021-05-02T00:24:44+5:302021-05-02T00:26:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs CSK Highlights mumbai indians won by 4 wickets what went wrong to csk | IPL 2021, MI vs CSK, Highlights: चेन्नईच्या धावांचा डोंगर पोलार्डसमोर ठेगंणा, 'धोनी ब्रिगेड'चं नेमकं काय चुकलं?

IPL 2021, MI vs CSK, Highlights: चेन्नईच्या धावांचा डोंगर पोलार्डसमोर ठेगंणा, 'धोनी ब्रिगेड'चं नेमकं काय चुकलं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs CSK, Highlights: आयपीएलमध्ये आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघानं चेन्नई सुपरकिंग्ज संघानं दिलेलं २१८ धावांचं आव्हान ४ विकेट्स राखून गाठलं आणि दमदार विजय साजरा केला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं आजवर एकदाही दोनशेवरील धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. आज मुंबईनं नवा विक्रम रचला. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डनं नाबाद ८७ धावांची खेळी साकारून चेन्नईचा धुव्वा उडवला. 

IPL 2021, MI vs CSK, Highlights:

  • चेन्नई सुपरकिंग्ज संघानं फलंदाजी एकदम दमदार केली. ऋतूराज गायकवाड स्वस्तात बाद झाला तरी फॅफ ड्यू प्लेसिसनं सलग चौथ्यांदा अर्धशतकी खेळी साकारली. तर मोईन अलीनंही ३६ चेंडूत ५८ धावांचं योगदान दिलं. ड्यू प्लेसिस आणि अली यांच्या भागीदारीमुळे चेन्नई सुपरकिंग्जचा पाया मजबूत झाला. 
  • मोईल अली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी खणखणीत सुरुवात करुन दिल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी अंबाती रायुडू 'हिरो' ठरला. अंबाती रायुडूनं अवघ्या २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. यात ७ खणखणीत षटकारांचा सामावेश होता. रायुडूच्या तुफान खेळीच्या जोरावर चेन्नईला दोनशे धावांच्या टप्पा पूर्ण करता आला. 
  • मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २१८ धावांचं आव्हान होतं. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी पावर-प्लेमध्ये विकेट टाकली नाही. पावर-प्लेमध्ये विकेट न गमावल्यानं मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढला आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा दबाव थोडा हलका होण्यास मदत झाली. 
  • चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं यावेळी पावर-प्लेमध्ये गोलंदाजीत फारसे बदल केले नाहीत. धोनीनं यावेळी सुरुवातीच्या षटकांमध्येच दीपक चहरची चार षटकं संपवून टाकली. चेन्नईसाठी ही खूप धोक्याची बाजू ठरली कारण अखेरच्या षटकांमध्ये संघाच्या मुख्य गोलंदाजाची आवश्यकता असताना त्याची षटकं संपुष्टात आली होती. त्यात चहरनं आज एकही विकेट घेतली नाही. 
  • कायरन पोलार्डनं चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली. पण पोलार्डला माघारी धाडण्याची एक नामी संधी चेन्नईला मिळाली होती. फॅफ ड्यू प्लेसिसकडून कायरन पोलार्डचा झेल सुटला आणि पोलार्डला जीवनदान मिळालं. चेन्नईसाठी ही सर्वात मोठी चूक ठरली. पोलार्डनं सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत मैदानात उभं राहून संघाला विजय मिळवून दिला. 
  • चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या गोलंदाजांकडून यावेळी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. चेन्नईचे गोलंदाज पोलार्डसमोर दबावात गोलंदाजी करत असल्याचं स्पष्ट दिसून येत होता. पोलार्डच्या मोठ्या फटक्यांपासून वाचण्यासाठी शार्दुक ठाकूर पोलार्डपासून चेंडू दूर ठेवण्याचा वांरवार प्रयत्न करत होता. पण यात शार्दुलनं अनेक वाइड चेंडू टाकले आणि मुंबई इंडियन्सला अतिरिक्त धावा मिळाल्या. 
  • चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या गोलंदाजांपैकी सॅम कुरन वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला अचूक यॉर्कर टाकता आले नाहीत. फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून रोखण्यासाठी यॉर्कर हे गोलंदाजाचं नामी अस्त्र असतं. पण ते वापरण्यात चेन्नईच्या गोलंदाजांना अपयश आल्याचं पाहायला मिळालं. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूर, लुंगी निगिडी यांच्याकडून फूट टॉस चेंडू टाकले गेले आणि याचा पोलार्डनं पुरेपूर फायदा घेतला. 

Web Title: IPL 2021 MI vs CSK Highlights mumbai indians won by 4 wickets what went wrong to csk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.