IPL 2021 : KKR vs PBKS T20 : पराभवानंतर कर्णधार लोकेश राहुल हताश; म्हणतो, काय बोलू हेच सूचत नाहीए! Video

पंजाब किंग्स ( Punjab Kings) चं ९ बाद १२३ धावांचा KKRनं १६.४ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:53 PM2021-04-26T23:53:33+5:302021-04-26T23:53:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, KKR vs PBKS T20 : I really don't know what to say, it was a poor performance from us, KL Rahul, Video | IPL 2021 : KKR vs PBKS T20 : पराभवानंतर कर्णधार लोकेश राहुल हताश; म्हणतो, काय बोलू हेच सूचत नाहीए! Video

IPL 2021 : KKR vs PBKS T20 : पराभवानंतर कर्णधार लोकेश राहुल हताश; म्हणतो, काय बोलू हेच सूचत नाहीए! Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शहर बदललं अन् कोलकाता नाईट रायडर्सचं ( Kolkata Knight Riders) नशीब पालटलं. पाच सामन्यांत सलग चार पराभवानंतर KKRनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजय मिळवला. पंजाब किंग्स ( Punjab Kings) चं ९ बाद १२३ धावांचा KKRनं १६.४ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला. या विजयासह कोलकातानं गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. सहा सामन्यांमधील त्यांचा हा दुसरा विजय ठरला, तर पंजाबनंही सहापैकी दोन सामने जिंकले आहेत. या पराभवानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) हतबल झालेला दिसला.   कोलकातानं विजय मिळवला, पण समस्या जैसे थे; पंजाबचीही डोकेदुखी कायम!

लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी PBKS सावध सुरूवात करून दिली. पण, अवघ्या सहा धावांत त्यांनी तीन प्रमुख खेळाडू गमावले. लोकेश ( १९), ख्रिस गेल ( ०) व दीपक हुडा ( १) हे झटपट बाद झाले. ख्रिस जॉर्डननं १८ चेंडूंत ३० ( १ चौकार व ३ षटकार) धावा कुटल्या आणि त्यामुळे पंजाब किंग्स ९ बाद १२३ धावांपर्यंत मजल मारू शकले. सुनील नरीन ( २-२२), प्रसिद्ध कृष्णा ( ३-३०), पॅट कमिन्स ( २-३१) यांनी पंजाब किंग्सला धक्के दिले. वरुण चक्रवर्थी ( १-२४) व शिवम मावी ( १-१३) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.  KKRचे तीन फलंदाज १७ धावात बाद, रवी बिश्नोईनं घेतला स्टनर कॅच, Video

शुबमन गिल, नितीश राणा व सुनील नरीन माघारी परतल्यानं KKR ची अवस्था ३ बाद १७ अशी झाली होती. कर्णधार इयॉन मॉर्गन व राहुल त्रिपाठी यांनी ४८ चेंडूंत ६६ धावा जोडल्या. त्यानंतर मॉर्गन व दिनेश कार्तिकनं कोलकाताचा विजय पक्का केला. सर जी तुस्सी ग्रेट हो!; रवींद्र जडेजानं लॉकडाऊनमध्ये केली मोठी समाजसेवा, बहिणीनं जगासमोर आणलं त्याचं कार्य!

लोकेश राहुल काय म्हणाला?
''खरंच काय बोलावं हेच सूचत नाहीए, आमच्याकडून ही अत्यंत खराब कामगिरी होती. नवीन खेळपट्टीशी लगेच जुळवून घ्यायला हवं, फलंदाजांनी कामगिरी सुधारायला हवी आणि २०-३० धावा अधिकच्या करायला हव्यात. खेळपट्टी संथ होती, परंतु १२०-१३० पुरेशा धावा नव्हत्या. काही विकेट भेट म्हणून दिल्या, त्या महागात पडल्या. आमचे आणखी काही सामने इथे आहेत आणि आशा करतो की आजच्या चुकांमधून शिकून खेळ करू,''असे लोकेश राहुलनं सामन्यानंतर सांगितले.

Web Title: IPL 2021, KKR vs PBKS T20 : I really don't know what to say, it was a poor performance from us, KL Rahul, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.