IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: ११ चेंडूत ४ विकेट्स घेऊन Delhi Capitalsने पलटवली होती बाजी, पण Kolkata Knight Ridersच्या Rahul Tripathiने असा खेचून आणला विजय

IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: आयपीएलमध्ये काल झालेल्या क्वालिफायर-२ च्या लढतीमध्ये अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळाली. अखेर या लढतीत Delhi Capitalsने केलेला चिवट प्रतिकार मोडून काढत Kolkata Knight Ridersने रोमहर्षक विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 07:32 AM2021-10-14T07:32:12+5:302021-10-14T07:40:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: Delhi Capitals were on the verge of victory with 4 wickets in 11 balls, but Kolkata Knight Riders Rahul Tripathi turned the tide | IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: ११ चेंडूत ४ विकेट्स घेऊन Delhi Capitalsने पलटवली होती बाजी, पण Kolkata Knight Ridersच्या Rahul Tripathiने असा खेचून आणला विजय

IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: ११ चेंडूत ४ विकेट्स घेऊन Delhi Capitalsने पलटवली होती बाजी, पण Kolkata Knight Ridersच्या Rahul Tripathiने असा खेचून आणला विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजाह - आयपीएलमध्ये काल झालेल्या क्वालिफायर-२ च्या लढतीमध्ये अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळाली. आधी दिल्लीला (Delhi Capitals ) माफक १३५ धावांत रोखल्यानंतर कोलकाता नाईटरायडर्सने ( Kolkata Knight Riders ) १ बाद १२३ अशी मजल मारली होती. आता कोलकात्याचा विजय निश्चित वाटत असतानाच दिल्लीच्या गोलंदाजांनी ११ चेंडूत ४ विकेट्स टिपल्या आणि संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून टाकले. मात्र सामन्यातील थरार इथेच संपला नाही. तर केकेआरला शेवटच्या २ चेंडून ६ धावांची गरज असताना राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) षटकार ठोकत कोलकाताला थेट अंतिम फेरीत पोहोचवले. (Kolkata Knight Riders in Finale)

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १३५ धावा बनवल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना कोलकाता नाईटरायडर्सने १७.५ षटकांमध्ये ३ बाद १२६ धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या १३ चेंडूत कोलकात्याला केवळ १० धावांची गरज होती. मात्र १८ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडाने दिनेश कार्तिकला शुन्यावर बाद करत कोलकात्याला चौथा धक्का दिला. त्यानंतर १९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या एन्रिच नॉर्खियाने कमाल केली. त्याने या षटकात केवळ ३ धावा देताना कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार मॉर्गनला माघारी धाडले.

शेवटच्या षटकामध्ये कोलकात्याला विजयासाठी ७ धावांची गरज होती. तसेच त्यांच्या हातात पाच विकेट्स होते. अखेरचे षटक टाकण्यासाठी आलेल्या रविचंद्रन अश्विनच्या पहिल्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने एक धाव घेतली. मात्र दुसऱ्या चेंडूवर शाकिब अल हसन धाव काढू शकला नाही. तिसऱ्या चेंडूवर शाकिब अल हसन बाद झाला. आता कोलकात्याला ३ चेंडूत सहा धावांची गरज होती. मात्र चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात सुनील नारायण बाद झाला. अश्विनला हॅटट्रिकची संधी होती. मात्र षटकातील पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने अश्विनने टाकलेल्या चेंडूला थेट सीमारेषेपार भिरकावत कोलकात्याला १ चेंडू आणि ३ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

कोलकात्याच्या संघाने याआधी २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला होता. तसेच या दोन्हीवेळा त्यांनी विजेतेपदावर नाव कोरले होते. आता कोलकात्याचा संघ ७ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता आयपीएलची अंतिम लढत १५ ऑक्टोबरला चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात रंगणार आहे.  

Web Title: IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: Delhi Capitals were on the verge of victory with 4 wickets in 11 balls, but Kolkata Knight Riders Rahul Tripathi turned the tide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.