IPL 2021, David Warner : डेव्हिड वॉर्नरचा SRH संघासोबतचा प्रवास इथेच संपला?; मुख्य प्रशिक्षकांचे सूचक विधान, तर फलंदाजाची इस्टा स्टोरी व्हायरल

सनरायझर्स हैदराबादनं IPL 2021मध्ये आज दुसऱ्या विजयाची नोंद केली. राजस्थान रॉयल्सवर त्यांनी ७ विकेट्स राखून विजय मिळवताला प्ले ऑफच्या आशा अजूनही कायम राखल्या आहेत. आता त्यांना उर्वरित चारही सामन्यात विजय मिळवाले लागतील. पाच पराभवानंतर हैदराबादनं अखेर विजय मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:31 AM2021-09-28T00:31:09+5:302021-09-28T00:32:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: David Warner unlikely to play for SRH rest of the season, says Trevor Bayliss, Aussie batsman insta story viral | IPL 2021, David Warner : डेव्हिड वॉर्नरचा SRH संघासोबतचा प्रवास इथेच संपला?; मुख्य प्रशिक्षकांचे सूचक विधान, तर फलंदाजाची इस्टा स्टोरी व्हायरल

IPL 2021, David Warner : डेव्हिड वॉर्नरचा SRH संघासोबतचा प्रवास इथेच संपला?; मुख्य प्रशिक्षकांचे सूचक विधान, तर फलंदाजाची इस्टा स्टोरी व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजस्थान रॉयल्सच्या ५ बाद १६४ धावांचा सनरायझर्स हैदराबादनं १८.३ षटकांत ३ बाद १६७ धावा करून यशस्वी पाठलाग केला. पण, या सामन्यात डेव्हिड वॉर्नरचं ( David Warner) नसणं अनेकांना खटकलं अन् पुढील आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. त्यात मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बायलिस ( Trevor Bayliss ) यांच्या विधानानं त्या चर्चांना खतपाणी मिळालं आहे. 

 IPL 2021, SRH vs RR : 'शेवटी पिल्लू आज हसली', SRHच्या विजयानंतर काव्या मारनवरील भन्नाट मीम्स व्हायरल

राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसननं ५७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या, तर यशस्वी जैस्वाल ( ३६) व महिपाल लोम्रोर ( २९) यांनी मोलाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या जेसन रॉयनं ४२ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. केन विलियम्सननं ४१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५१ धावा, तर अभिषेक शर्मानं नाबाद २१ धावा करून हैदराबादचा विजय पक्का केला. 

हैदराबादनं आजच्या सामन्याची जेव्हा प्लेइंग इलेव्हन जाहीर केली, त्यात डेव्हिड वॉर्नरचं नाव न दिसल्यानं अनेकांना धक्का बसला. वॉर्नर फॉर्माशी झगडत असला तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. तरीही त्याला बाकावर बसवण्यात आले आणि या पर्वात तो SRHकडून खेळण्याची शक्यता फार कमी असल्याचे विधान बायलिस यांनी केले ( David Warner unlikely to play for SRH rest of the season, says Trevor Bayliss). आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील दोन सामन्यात वॉर्नरला ० व २ अशी कामगिरी करता आली होती.

सनरायझर्स हैदराबादच्या प्ले ऑफच्या आशा अजूनही कायम; जाणून घ्या RRचं नेमकं कुठे चुकलं
 

ते म्हणाले, आमच्याकडे अनेक युवा खेळाडू आहेत. या सामन्यात आम्ही काही युवा खेळाडूंना संधी देण्याचे ठरवले होते आणि त्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार होतो. त्यांना अनुभव मिळावा हा यामागचा हेतू होता. आतापर्यंत ते हॉटेलमध्येच थांबून सामना पाहत होते. त्यामुळे या युवा खेळाडूंना अधिकाधिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सामन्यासाठी डेव्हिड वॉर्नर, केदार जाधव व नदीम हे हॉटेलमध्येच थांबले होते.

पुढील सामन्यांतही युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयोग कायम राहणार असल्याचे संकेत देताना बायलिस यांनी वॉर्नर आात पुढे खेळण्याची शक्यता कमीच आहे, असा सूचक इशारा दिला. त्याचवेळी त्यांनी वॉर्नरच्या भविष्याबाबत चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी मान्य केले. सनरायझर्स हैदराबादच्या यशात वॉर्नरचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याचा आदर करायलाच हवा. आयपीएलमधील त्याची धावांची भूक अद्याप संपलेली नाही, असेही ते म्हणाले.
सनरायझर्स 

Web Title: IPL 2021: David Warner unlikely to play for SRH rest of the season, says Trevor Bayliss, Aussie batsman insta story viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.