IPL 2021 : SRH मॅनेजमेंटनं न सांगताच कर्णधारपद काढून घेतलं, David Warner नं सांगितली 'मन की बात'

IPL 2021 : IPL च्या १४ व्या सीझनच्या पहिल्या पर्वात न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला सनरायझर्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:04 AM2021-10-13T11:04:26+5:302021-10-13T11:04:53+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 David Warner on Sunrisers axing Bitter pill to swallow but I dont think I will ever get answers | IPL 2021 : SRH मॅनेजमेंटनं न सांगताच कर्णधारपद काढून घेतलं, David Warner नं सांगितली 'मन की बात'

IPL 2021 : SRH मॅनेजमेंटनं न सांगताच कर्णधारपद काढून घेतलं, David Warner नं सांगितली 'मन की बात'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देIPL च्या १४ व्या सीझनच्या पहिल्या पर्वात न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला सनरायझर्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ व्यवस्थापनानं कर्णधारपदावरून हटवण्याचं कारण सांगितलं नसल्याची माहिती समोर आली आहे. या पर्वात आपल्याकडून कर्णधारपद का काढून घेण्यात आलं याबद्दल आपल्याला माहिती देण्यात आली नाही असं वॉर्नर म्हणाला. फॉर्मच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला असेल तर ते निराशाजनक असल्याचं सांगत यापुढेही आपली सनरायझर्स हैदराबाद संघातूच खेळण्याची इच्छा असल्याचं वॉर्नर म्हणाला. 

आयपीएल १४ च्या पहिल्या टप्प्यात वॉर्नरला कर्णधार पदावरून हटवण्यात आलं होतं. तसंच त्याला अखेरच्या काही सामन्यात संघात स्थानही देण्यात आलं नव्हतं. त्याच्या जागी न्यूझीलंडच्या केन विलियमसनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. यानंतरही सनरायझर्सच्या खेळात सुधारणा झाली नव्हती. हा संघ आयपीएलच्या गुण तालिकेत अखेरच्या स्थानी राहिला. त्यांना १४ पैकी ११ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. डेव्हिड वॉर्नरनं इंडिया डुटेशी संवाद साधताना कर्णधारपदावर भाष्य केलं. 

"कोणताही निर्णय सर्वांच्या संमतीनं घेतला जातो. कर्णधारपदावरून मला का हटवण्यात आलं याचं कारण मला सांगण्यात आलं नाही. यापूर्वीची कामगिरी दुर्लक्षित करून चालणार नाही, फॉर्मच्या आधारावर हा निर्णय घेतला असेल तर कठीण आहे, हे मी सर्व संघाच्या मालकांचा आदर करत सांगत आहे," असं वॉर्नर म्हणाला. 

माझे काही प्रश्न पण...
"संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं जाण्याचा निर्णय माझ्यासाठी सहजरित्या स्वीकारण्यासारखा नव्हता. मी आपल्या संघासाठी १०० सामने खेळलो आहे. चेन्नईसोबतच्या सामन्यापूर्वी चार पाच सामन्यांमध्ये माझी कामगिरी खराब होती. माझे काही प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं कधीच मिळणार नाही असं वाटतं, आपल्याला पुढे जावंच लागेल," असंही तो यावेळी म्हणाला. 

यापुढेही आपल्याला सनरायझर्ससाठी खेळण्याची इच्छा आहे. परंतु ते आपल्या हाती नाही. मी पुन्हा पुनरागमन करेन अशी अपेक्षा आहे. परंतु ते सनरायझर्सच्या संघासोबत किंवा अन्य कोणत्या याची कल्पना नसल्याचंही त्यानं सांगितलं.

Web Title: ipl 2021 David Warner on Sunrisers axing Bitter pill to swallow but I dont think I will ever get answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.