IPL 2021, CSK Vs SRH T20 Live : चेन्नई सुपर किंग्सचा विजयी 'पंच'; सनरायझर्स हैदराबादची पुढील वाटचाल बिकट

ipl 2021  t20 CSK Vs SRH live match score updates Delhi : ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) विजयाचा मजबूत पाया रचला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 11:01 PM2021-04-28T23:01:28+5:302021-04-28T23:02:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK Vs SRH T20 Live: Chennai Super Kings won by 7 wickets, moves to top of the points table | IPL 2021, CSK Vs SRH T20 Live : चेन्नई सुपर किंग्सचा विजयी 'पंच'; सनरायझर्स हैदराबादची पुढील वाटचाल बिकट

IPL 2021, CSK Vs SRH T20 Live : चेन्नई सुपर किंग्सचा विजयी 'पंच'; सनरायझर्स हैदराबादची पुढील वाटचाल बिकट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 CSK Vs SRH live match score updates Delhi : ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) विजयाचा मजबूत पाया रचला. त्यावर अन्य फलंदाजांनी विजयाचा कळस चढवला. सनरायझर्स हैदराबादचे ( SRH) गोलंदाजांना आज पूरते अपयशी ठरले. हैदराबादचा हा सहाव्या सामन्यातील पाचवा पराभव ठरल्यानं स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल. हैदराबादकडून राशिद खाननं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) ७ विकेट्स राखून हा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकले आहे. चेन्नईनं १८.३ षटकांत विजयी लक्ष्य पार केले. IPL 2021 : CSK Vs SRH T20 Live Score Update

कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत १०६ धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये ५० अर्धशतक झळकावणारा वॉर्नर हा पहिलाच खेळाडू ठरला.  या अर्धशतकासह त्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला पार केला. शिवाय आयपीएलमध्ये त्यानं २०० षटकारही पूर्ण केले.  वॉर्रननं ५५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या. मनीष ४६ चेंडूंत ६१ धावा ( ५ चौकार व १ षटकार) करून बाद झाला. शार्दूल ठाकूरनं टाकलेल्या १९व्या षटकात केन विलियम्सननं २० धावा चोपल्या. अखेरच्या षटकात १३ धावा आल्या. केन १० चेंडूंत २६ आणि केदार जाधव ४ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. CSK Vs SRH Live Score, IPL 2021 CSK Vs SRH, CSK Vs SRH Live Match  सुरेश रैनाचा Fair Play; Mr. IPLच्या प्रांजळ कबुलीनं जिंकली मनं, CSKलाही मोठा फायदा

प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे उपटली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना चेन्नईची विजयाच्या दिशेनं जोरदार आगेकूच करून दिली. या दोघांनी सलग तिसऱ्या सामन्यात ५०+ धावांची भागीदारी केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केलं, फॅफनं ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेताना अन्य फलंदाजांसमोर तगडे आव्हान उभे केले. ( Faf Du Plessis is now the orange cap holder of IPL 2021). १३व्या षटकात राशिद खानला सलग दोन खणखणीत चौकार खेचल्यानंतर ऋतुराज अखेरच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. ऋतुराजनं ४४ चेंडूंत १२ चौकारांसह ७५ धावा केल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.  CSK Vs SRH IPL Matches, CSK Vs SRH IPL match 2021, CSK Vs SRH T20 Match


ऋतुराजला बाद करण्यात SRHच्या गोलंदाजांना फार उशीर झाला. या दोघांनी CSKच्या विजयाचा मजबूत पाया रचला होता. त्यामुळे CSKच्या अन्य फलंदाजांना केवळ विजयाची औपचारिकता पूर्ण करायची होती. इथून कोणतातरी करिष्माच SRHला विजय मिळून देऊ शकत होता. राशिदनं पुढच्या षटकात मोईन अली ( १५) व फॅफ यांना सलग दोन चेंडूंत माघारी पाठवून सामन्यात चुरस निर्माण केली होती. फॅफनं ३८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६ धावा केल्या. अखेरच्या पाच षटकांत चेन्नईला २४ धावांची गरज होती. रवींद्र जडेजा व सुरेश रैना यांनी CSKचा विजय पक्का केला. CSK Vs SRH Live Score, IPL 2021 CSK Vs SRH, CSK Vs SRH Live Match

Web Title: IPL 2021, CSK Vs SRH T20 Live: Chennai Super Kings won by 7 wickets, moves to top of the points table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.