IPL 2021चं बायो बबल सर्वात असुरक्षित, परिस्थिती खूपच भयानक; अ‍ॅडम झम्पानं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अ‍ॅडम झम्पा ( Adam Zampa) यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातून माघार घेण्यामागचं खरं कारण सांगितलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:30 AM2021-04-28T08:30:00+5:302021-04-28T08:30:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 bio bubble in India felt most vulnerable, UAE was extremely safe: Australia’s Adam Zampa | IPL 2021चं बायो बबल सर्वात असुरक्षित, परिस्थिती खूपच भयानक; अ‍ॅडम झम्पानं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण

IPL 2021चं बायो बबल सर्वात असुरक्षित, परिस्थिती खूपच भयानक; अ‍ॅडम झम्पानं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अ‍ॅडम झम्पा ( Adam Zampa) यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातून माघार घेण्यामागचं खरं कारण सांगितलं. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएलच्या तुलनेत यंदाच्या पर्वातील बायो बबल हे सर्वात असुरक्षित असल्याचं मत त्यानं व्यक्त केलं. राजस्थान रॉयल्सचा अँड्य्रू टाय यानं भारतातील कोरोना परिस्थिती पाहून मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या ( RCB) झम्पा व केन रिचर्डसन यांनीही मायदेशासाठी मंगळवारी रात्री विमान पकडले.  मोहम्मद सिराजच्या एका निर्धाव चेंडूनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित केला! 

The Age and the Herald यांच्याशी बोलताना झम्पानं भारतातील कोरोना परिस्थिती खूपच भयानक आहे आणि  बायो बबलमध्ये राहून थकवा आहे, शिवाय सराव सत्रात प्रोत्साहनही दिलं जात नसल्याचे सांगितले. गतवर्षी यूएईत पार पडलेली आयपीएल स्पर्धा यंदाच्या स्पर्धेपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचेही त्याला वाटते. ''आतापर्यंत आम्ही अनेक बायो बबलमध्ये खेळलो आहोत आणि भारतातील हे बायो बबल सर्वात असुरक्षित आहे, असे मला वाटते. कारण एकतर हे भारत आहे, येथील स्वच्छतेबद्दल नेहमी आम्हाला सांगितले जाते आणि त्यामुळे आम्हाला अधिकची काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच हे बायो बबल असुरक्षित असल्याचे मला वाटते,''असे तो म्हणाला. मुंबई इंडियन्सच्या राखीव गोलंदाजाला RCB नं केलं करारबद्ध, केन रिचर्डसनला केलं रिप्लेस!

''सहा महिन्यांपूर्वी यूएईत झालेल्या आयपीएलच्या वेळी असं वाटलं नव्हतं. तेथील लीग सर्वात सुरक्षित होती. यंदाच्या आयपीएलसाठीही तोच योग्य पर्याय असल्याचे मला वैयक्तिकरित्या वाटते, परंतु यातही अनेक राजकीय घडामोडी आहेत.  या वर्षाच्या अखेरीस येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. क्रिकेट विश्वात आता पुढील चर्चेचा विषय तोच असेल. सहा महिने अजून बराच काळ आहे,''असेही तो म्हणाला. मानलं भावा; ब्रेट ली यानं ऑक्सिजन खरेदीसाठी केली ४३ लाखांची मदत; म्हणाला, भारत हे माझं दुसरं घर!

झम्पाला एकही सामना खेळण्याची यंदा संधी मिळालेली नाही आणि नुकतंच तो विवाहबंधनातही अडकला आहे. आयपीएलमधून माघार घेतल्यानं होणाऱ्या आर्थिक नुकसानीची झम्पा पर्वा करत नाही. तो म्हणाला,''हो ही आर्थिक तडजोड आहे. पण, माझ्यासाठी माझे मानसिक आरोग्य तंदुरूस्त राहणे याला प्राधान्य आहे.''

Web Title: IPL 2021 bio bubble in India felt most vulnerable, UAE was extremely safe: Australia’s Adam Zampa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.