IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का?; भुवनेश्वर तीन षटकं टाकून मैदानाबाहेर गेला तो आलाच नाही!

IPL 2021, Bhuvneshwar Kumar: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 06:43 PM2021-04-21T18:43:31+5:302021-04-21T18:45:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Bhuvneshwar Kumar gives SRH a massive injury scare | IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का?; भुवनेश्वर तीन षटकं टाकून मैदानाबाहेर गेला तो आलाच नाही!

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का?; भुवनेश्वर तीन षटकं टाकून मैदानाबाहेर गेला तो आलाच नाही!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Bhuvneshwar Kumar: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. गोलंदाजी करतेवेळी भुवनेश्वर कुमारच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यानं तो सामन्यात केवळ तीन षटकं टाकू शकला आहे. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला तो संपूर्ण डाव संपेपर्यंत परतलाच नाही. त्यामुळे भुवनेश्वरला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात भुवनेश्वरच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापनाकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. (IPL 2021: Bhuvneshwar Kumar gives SRH a massive injury scare)

IPL 2021: पंजाबनं त्याच्यावर पाण्यासारखा पैसा ओतला, पण ४ सामन्यांत ३ वेळा झाला शून्यावर बाद!

सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी आज पंजाब किंग्ज विरुद्ध भेदक गोलंदाजी केली. गेल्या तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या हैदराबादच्या संघाला आजच्या सामन्यात सुर गवसलेला पाहायला मिळाला. भुवनेश्वरनं पहिल्या षटकात सहा धावा दिल्या. त्यानंतरच्या षटकात त्यानं पंजाबच्या कर्णधार केएल राहुलला बाद करुन संघाला मोठं यश मिळवून दिलं. वॉर्नरनं भुवनेश्वरकडून त्याचं तिसरं षटक देखील पावर-प्लेमध्येच पूर्ण करुन घेतलं. भुवीनं टाकलेल्या तीन षटकांमध्ये त्यानं १६ धावा देत एक विकेट घेतली. 

IPL 2021: अमित मिश्रा जेव्हा सेहवागला म्हणतो...वीरु भाई प्लीज आतातरी माझं मानधन वाढवा!

भुवनेश्वर कुमार संघाचा मुख्य गोलंदाज आहे. त्यामुळे सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये त्याचं उर्वरित एक षटक होणं अपेक्षित होतं. पण सामन्याच्या मध्यात भुवनेश्वर त्याच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो संपूर्ण डाव संपेपर्यंत माघारी परतलाच नाही. अखेरच्या षटकांची जबाबदारी सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद यांनी पार पाडली. 

लोकेश राहुल पाकिस्तानच्या बाबर आजमला पुरुन उरला; मोठा पराक्रम केला!

हैदराबादसमोर अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. आधीच संघाचं विजयाचं खातं अद्याप उघडलेलं नसताना टी. नटराजन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यात आता भुवनेश्वर कुमारची दुखापत देखील संघासाठी चिंता वाढवणारी आहे. 
 

Web Title: IPL 2021 Bhuvneshwar Kumar gives SRH a massive injury scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.