IPL 2021: बाप तशी लेक; रोहित शर्माच्या मुलीनं हेल्मेट घालून लगावला 'हिटमॅन'सारखा षटकार, Video 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय खेळाडू आता आयपीएल ( IPL 2021) च्या १४व्या पर्वासाठी सज्ज झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:40 PM2021-03-31T14:40:31+5:302021-03-31T14:41:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Baby Samaira shows mummy Ritika Sajdeh how daddy Rohit Sharma hits a six, Video | IPL 2021: बाप तशी लेक; रोहित शर्माच्या मुलीनं हेल्मेट घालून लगावला 'हिटमॅन'सारखा षटकार, Video 

IPL 2021: बाप तशी लेक; रोहित शर्माच्या मुलीनं हेल्मेट घालून लगावला 'हिटमॅन'सारखा षटकार, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय खेळाडू आता आयपीएल ( IPL 2021) च्या १४व्या पर्वासाठी सज्ज झाले आहेत. कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करून षटकार मारण्याच्या तयारीत आहेत. आता सर्व खेळाडू बायो-बबलमध्ये आहेत आणि सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. त्यात मुंबई इंडियन्सनं बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात रोहितची मुलगी समायरा ( Samaira) आई रितिका सजदेह हिच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. हेल्मेट घालून समायरानं रोहित कसा षटकार मारतो, याची नकलही करून दाखवली.  विराट कोहलीचं BCCIनं ऐकलं; वादग्रस्त नियम रद्द करून जाहीर केली नियमावली!

पाहा व्हिडीओ...


मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक
 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021 Schedule) १४व्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने ( IPL Matches) होणार आहेत. या शहरांमधये मुंबईचे नाव असल्यानं मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) चाहते आनंदीत झाले आहेत, परंतु त्यांचा हा आनंद क्षणात गायबही झाला. कोरोना परिस्थितीमुळे IPL 2021च्या सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यात यंदाच्या आयपीएलमध्ये एक वेगळाच प्रयोग करण्यात येत आहे आणि त्यामुळे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर IPL 2021 Match होतील, परंतु मुंबई इंडियन्स ( MI ) एकही सामना खेळणार नाही.  मुंबई इंडियन्सला पराभूत करणं अवघड, 'हे' खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड; दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians full squad ) - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग 

( IPL 2021 Auction) लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख

मुंबई इंडियन्सनचं संपूर्ण वेळापत्रक ( MI’s schedule for IPL 2021 )

तारीखसामनावेळठिकाण
९ एप्रिलवि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसायं. ७.३० वा.चेन्नई
१३ एप्रिलवि. कोलकाता नाईट रायडर्ससायं. ७.३० वा.चेन्नई
१७ एप्रिलवि. सनरायझर्स हैदराबादसायं. ७.३० वा.चेन्नई
२० एप्रिलवि. दिल्ली कॅपिटल्ससायं. ७.३० वा.चेन्नई
२३ एप्रिलवि. पंजाब किंग्ससायं. ७.३० वा.चेन्नई
२९ एप्रिलवि. राजस्थान रॉयल्सदु. ३.३० वा.दिल्ली
१ मेवि. चेन्नई सुपर किंग्ससायं. ७.३० वा.दिल्ली
४ मेवि. सनरायझर्स हैदराबादसायं. ७.३० वा.दिल्ली
८ मेवि. राजस्थान रॉयल्ससायं. ७.३० वा.दिल्ली
१० मेवि. कोलकाता नाईट रायडर्ससायं. ७.३० वा.बंगळुरू
१३ मेवि. पंजाब किंग्सदु. ३.३० वा.बंगळुरू
१६ मेवि. चेन्नई सुपर किंग्ससायं. ७.३० वा.बंगळुरू
२० मेवि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसायं. ७.३० वा.कोलकाता
२३ मेवि. दिल्ली कॅपिटल्सदु. ३.३० वा.कोलकाता

Web Title: IPL 2021 : Baby Samaira shows mummy Ritika Sajdeh how daddy Rohit Sharma hits a six, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.