Big Blow : राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का, ऑसी गोलंदाजाची माघार; सोबतीला उरले फक्त चारच परदेशी खेळाडू!

राजस्थान रॉयल्ससाठी ( Rajasthan Royals) यंदाचे पर्व संकटाचे दिसत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर आगेकूच केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 05:35 PM2021-04-25T17:35:12+5:302021-04-25T17:35:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Andre Tye has left the Rajasthan Royals' squad and went back to his home, They're left with only 4 overseas players now | Big Blow : राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का, ऑसी गोलंदाजाची माघार; सोबतीला उरले फक्त चारच परदेशी खेळाडू!

Big Blow : राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का, ऑसी गोलंदाजाची माघार; सोबतीला उरले फक्त चारच परदेशी खेळाडू!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजस्थान रॉयल्ससाठी ( Rajasthan Royals) यंदाचे पर्व संकटाचे दिसत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर आगेकूच केली. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RRला पाच सामन्यांत दोनच विजय मिळवता आले आहेत. त्यांची गाडी आता कुठे रुळावर येतेय, असं वाटत असताना रविवारी त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज अँड्य्रू टाय ( Andrew Tye) यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं IPL 2021चे बायो बबल सोडले असून ऑस्ट्रेलियासाठी तो सकाळीच रवाना झाला आहे. Mr. IPL सुरेश रैनाच्या बॅटीतून आला विक्रमी षटकार; विराट कोहली, ख्रिस गेल यांच्या पंक्तित स्थान

आयपीएलला सुरूवात होण्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) दुखापतीशी झगडत होता आणि तो भारत-इंग्लंड मालिकेनंतर मायदेशात परतला. त्यानंतर पंजाब किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झेल पकडताना बेन स्टोक्सच्या ( Ben Stokes) बोटाला दुखापत झाली आणि फ्रँक्चर बोटावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी तो इंग्लंडला परतला. त्याला १२ आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा फलंदाज लायम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone ) यानं बायो बबलला कंटाळून माघार घेतली. हे दोन धक्के बसल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानं एक रिलीज जाहीर केलं आणि त्यात जोफ्रा संपूर्ण आयपीएलला मुकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.  ZIM vs PAK : विराट कोहलीला धक्का, पाकिस्तानच्या बाबर आजमनं मोडला त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

राजस्थान रॉयल्ससाठी हा मोठा धक्का होता. त्यात टायनं माघार घेतली. यंदाच्या पर्वात टाय एकमेव सामना खेळला. मागच्या पर्वातही टायनं एका सामन्यात एक विकेट घेतली होती. चार परदेशी खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे RRकडे आता जोस बटलर, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस व मुश्ताफिजून रहमान हे चारच परदेशी पर्याय उरले आहेत. राजस्थानचा पुढील सामना २९ एप्रिलला नवी दिल्ली येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.  'कोरोना संकटातही IPL सुरू, भारताला माझ्या शुभेच्छा'; अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ट्वीटची चर्चा, नेटिझन्सनी दिलं उत्तर

Web Title: IPL 2021 : Andre Tye has left the Rajasthan Royals' squad and went back to his home, They're left with only 4 overseas players now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.