IPL 2021 : अदानी ग्रुप आयपीएल टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक, दुसऱ्या नव्या संघासाठी पुण्यासह तीन शहरांची चर्चा

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) IPL 2020त ऐतिहासिक जेतेपद पटकावताना प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) विजय मिळवला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 15, 2020 10:09 AM2020-11-15T10:09:36+5:302020-11-15T10:11:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Adani Group and Sanjiv Goenka group are interested for buying new IPL team | IPL 2021 : अदानी ग्रुप आयपीएल टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक, दुसऱ्या नव्या संघासाठी पुण्यासह तीन शहरांची चर्चा

IPL 2021 : अदानी ग्रुप आयपीएल टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक, दुसऱ्या नव्या संघासाठी पुण्यासह तीन शहरांची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देIPL चे पुढील पर्व भारतातच घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न, एप्रिल-मे मध्ये होईल स्पर्धाबीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करणार, IPL 2021साठी लिलाव होणार की नाही?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020)  13व्या पर्वाच्या यशस्वी आयोजनानंतर BCCIनं पुढील वर्षी होणाऱ्या IPL 2021 साठी हालचाली सुरू केल्या आहेत. 2021मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी लिलाव ( IPL 2021 Auction) होणार की नाही, संघ संख्या वाढणार या सर्वांची चर्चा सध्या जोर धरत आहे. लिलावावरून फ्रँचायझींमध्येही दोन गट पडले आहेत आणि या सर्वांवर BCCI दिवाळीनंतर किंवा डिसेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात निर्णय घेणार आहेत. पण, बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार आयपीएल 2021मध्ये दोन संघ वाढणार आहेत आणि त्यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल, हेही जवळपास निश्चित आहे. या दोन संघांपैकी एका संघासाठी अदानी ग्रुप आग्रही असल्याचे वृत्त समोर येत आहे.

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) ऐतिहासिक जेतेपद पटकावताना प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) विजय मिळवला. या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे २०२१च्या आयपीएलसाठी CSKला नव्यानं संघबांधणी करायची आहे. बीसीसीआयनंही मेगा ऑक्शनची तयारी केली आहे. पण, त्यावरून फ्रँचायझींमध्ये मतभिन्नता दिसत आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे या कालावधीत भारतातच आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पण, त्यात दोन संघांची भर पडण्याची शक्यता वर्तवरण्यात येत आहे. मागील वर्षीच अशी चर्चा रंगली होती. डिसेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात बीसीसीआय मेगा प्लानबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. संजिव गोएंका ग्रुपनं 2016 व 2017 च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. 

फ्रँचायझींमध्ये मतभिन्नता...

मेगा ऑक्शन संदर्भात काही फ्रँचायझी नाखुश आहेत. बऱ्याच फ्रँचायझींनी त्यांची कोर टीम तयार केली आहे आणि त्या टीमलाच प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. अशात लिलाव घेण्यात आल्यास त्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो. पण, लिलाव झाल्यास काही संघांना नव्यानं संघबांधणी करणे शक्य होईल आणि त्यामुळे त्यांचा या लिलावाला पाठींबा आहे, असे सूत्रांनी सांगितले.  

मेगा ऑक्शन झाल्यास सर्वाधिक फायदा हा चेन्नई सुपर किंग्सला होईल. पुढील पर्वासाठी ते संपूर्ण संघ बदलण्याची शक्यता आहे. शेन वॉटसननं निवृत्ती घेतली आहे, तर इम्रान ताहीर, पीयूष चावला, हरभजन सिंग, मुरली विजय, केदार जाधव यांना संघ रिलीज करू शकतो. त्यामुळे त्यांना ऑक्शनची गरज आहे.  

अंतिम ११मध्ये आता ५ परदेशी खेळाडू?
फ्रँचाझींना भारतीय खेळाडूंमध्ये स्पार्क सापडत नाही, त्यामुळे संघ संख्या वाढल्यास त्यांना क्वालिटी खेळाडू मिळवताना जड जाईल. त्यामुळे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं अंतिम ११मधील परदेशी खेळाडूंची संख्या ५ करावी असा पर्याय सूचवला आहे.  
 

Web Title: IPL 2021 : Adani Group and Sanjiv Goenka group are interested for buying new IPL team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.