IPL 2020 : कोणाला असेल ‘प्ले ऑफ’ची संधी, असं आहे पॉईंट्स टेबलचं समीकरण

IPL 2020 News : सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने आठ गडी राखून दणक्यात विजय साजरा करताच प्ले ऑफची रंगत आणखीच वाढली. कोणत्या संघाला नेमकी  किती टक्के संधी असेल त्यासाठी काही मुद्यांचा येथे उहापोह करण्यात येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 04:21 AM2020-10-28T04:21:35+5:302020-10-28T07:02:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Who will have a chance to play 'off', is the equation of the points table | IPL 2020 : कोणाला असेल ‘प्ले ऑफ’ची संधी, असं आहे पॉईंट्स टेबलचं समीकरण

IPL 2020 : कोणाला असेल ‘प्ले ऑफ’ची संधी, असं आहे पॉईंट्स टेबलचं समीकरण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई - आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत बरेच चढ-उतार अनुभवायला मिळाले. चेन्नई सुपरकिंग्ज साखळी फेरीतच आयपीएलमधून बाहेर पडल्यामुळे उर्वरित सात संघांमध्ये प्ले ऑफसाठी चढाओढ सुरू झाली. सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने आठ गडी राखून दणक्यात विजय साजरा करताच प्ले ऑफची रंगत आणखीच वाढली. कोणत्या संघाला नेमकी  किती टक्के संधी असेल त्यासाठी काही मुद्यांचा येथे उहापोह करण्यात येत आहे. 

१ कुठलाही संघ अधिकाधिक २० गुणांची कमाई करून प्ले ऑफ निश्चित करू शकेल.
२ मुंबई इडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या तीनच संघांना २० गुणांची कमाई करणे शक्य आहे.
३ यापैकी एखाद्या संघाने २० गुणांची कमाई केली  तरी अन्य दोन संघांना ते शक्य होणार नाही.
४ या तीन संघांव्यतिरिक्त अन्य संघांना १६ गुणांच्यापुढे  जाणे शक्य नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब मात्र मुसंडी मारू शकतात.
५ आता १० सामने शिल्लक आहेत. अशावेळी पावसामुळे सामना रद्द न झाल्यास  निकालाद्वारे वेगवगळे साधर्म्य शक्य होणार आहे.
६ चेन्नई संघ प्ले ऑफमधून आधीच बाहेर पडला आहे.
७ राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफची आशा पल्लवीत ठेवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यांनी तसे केले तरीही  चौथ्या स्थानासाठी  गुणांची बरोबरी होण्याची केवळ ३ टक्के शक्यता असेल.
८ सनरायजर्स हैदराबाद संघ पात्रता गाठण्याची शक्यतादेखील धूसर आहे. त्यांना  तिन्ही सामने  जिंकावे लागणार आहेत. सामने जिंकल्यानंतरही चौथ्या स्थानावर चढाओढीची केवळ ७ टक्के शक्यता असेल.
९ मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांच्या पात्रतेची शक्यता मात्र ९५ टक्के इतकी आहे.
१० यापैकी कोणत्याही संघाची पात्रतेची संधी हुकली तरी चौथ्या स्थानावर संयुक्त स्थान मिळण्याची ०.८ टक्के इतकीच शक्यता असेल.
११ कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे संघ मात्र चौथ्या स्थानासाठी प्रभावी दावेदार मानले जात आहेत.
१२ केकेआर किंवा किंग्ज इलेव्हन पंजाब  यांची अव्वल स्थानावर झेप  घेण्याची शक्यता क्षीण आहे. तथापि, यापैकी एखादा संघ संयुक्त अव्वल स्थान पटकविण्याची केवळ ०.८ टक्के शक्यता आहे. 

Web Title: IPL 2020: Who will have a chance to play 'off', is the equation of the points table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020