IPL 2020 : नेक्स्ट जनरेशनच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची योग्य वेळ; MS Dhoniनं सांगितला CSKचा फ्युचर प्लान

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 1, 2020 08:06 PM2020-11-01T20:06:17+5:302020-11-01T20:06:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : We will come back stronger in 2021; It's time to hand it over to the next generation, say MS Dhoni  | IPL 2020 : नेक्स्ट जनरेशनच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची योग्य वेळ; MS Dhoniनं सांगितला CSKचा फ्युचर प्लान

IPL 2020 : नेक्स्ट जनरेशनच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची योग्य वेळ; MS Dhoniनं सांगितला CSKचा फ्युचर प्लान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला. IPL 2020च्या प्ले ऑफमधून बाद झालेल्या CSKनं विजयाची हॅटट्रिक साजरी करताना KXIPचे आव्हानही संपुष्टात आणले. प्ले ऑफच्या सामन्यात आव्हान कायम ठेवण्यासाठी KXIPला हा सामना जिंकणे गरजेचे होते, परंतु आता त्यांचेही पॅकअप झाले. करा किंवा मरा या सामन्यात पंजाबचे महत्त्वाचे खेळाडूच अपयशी झाले आणि त्याचा मोठा भुर्दंड त्यांना भरावा लागला. CSKनं IPL2020चा विजयानं निरोप घेतला. ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKचा विजय पक्का केला. 

पंजाबनं दीपक हुडाच्या ३० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर ६ बाद १५३ धावांचा पल्ला गाठला.  प्रत्युत्तरात CSKचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. ख्रिस जॉर्डननं KXIPला पहिलं यश मिळवून दिलं. फॅफ ३४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ४८ धावांवर माघारी परतला. पण, गायकवाड एका बाजूने खेळपट्टीवर नांगर रोवून होता. त्यानं अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. गायकवाड ४९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६२ धावावंर, तर रायुडू ३० धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं १८.५ षटकांत १ बाद १५४ धावा केल्या. 

पाहा व्हिडीओ...

सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला,''यंदाचे पर्व आव्हानात्मक होते. आमच्याकडून अनेक चुका झाल्या. अखेरच्या चार सामन्यांत आम्हाला सूर गवसला. ७-८ सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर असं कमबॅक करणं सोपं नाही, त्यामुळे खेळाडूंचा अभिमान वाटतो. पराभवामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणात उत्साह नव्हता, त्यातही खेळाडूंनी चांगले पुनरागमन केलं.''

''आयपीएल २०२१च्या लिलावासाठी बीसीसीआय काय निर्णय घेते, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. आम्हाला कोर गटात थोडा बदल करण्याची गरज आहे आणि पुढील दहा वर्षांचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. आयपीएलच्या सुरुवातीला आम्ही पुढील दहा वर्षांचा विचार करून संघबांधणी केली. आता नेक्स्ट जनरेशनच्या हाती चावी देण्याची वेळ आलीय. चाहत्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही दमदार कमबॅक करू. त्यासाठीच आम्ही ओळखले जातो. आम्ही गुणतक्त्यात ८व्या स्थानावर होतो आणि १४ गुणांसह आम्ही प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकलो असतो,''असेही धोनी म्हणाला.

''ऋतुराज गायकवाडची नेटमध्ये फलंदाजी सुरेख झाली होती, परंतु सामन्यात त्याच्याकडून तसा खेळ झाला नाही. त्यानंतर त्याला कोरोना झाला आणि २० दिवसांनंतरही तो फिट दिसत नव्हता. त्या एका कारणामुळे आम्ही फॅफ ड्यू प्लेसिस व शेन वॉटसन यांच्यासह खेळत राहिलो. ही रणनिती योग्य ठरली नाही,''हेही धोनीनं मान्य केलं.


 

Web Title: IPL 2020 : We will come back stronger in 2021; It's time to hand it over to the next generation, say MS Dhoni 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.