IPL 2020 : फोटोग्राफर एबी डिव्हिलियर्स; विराट कोहली-अनुष्का शर्माचा रोमँटिक फोटो व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं रविवारी पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) सोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 09:33 PM2020-10-18T21:33:20+5:302020-10-18T21:33:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Virat Kohli share Romantic Photo with Anushka Sharma, pic credit to AB de Villiers | IPL 2020 : फोटोग्राफर एबी डिव्हिलियर्स; विराट कोहली-अनुष्का शर्माचा रोमँटिक फोटो व्हायरल

IPL 2020 : फोटोग्राफर एबी डिव्हिलियर्स; विराट कोहली-अनुष्का शर्माचा रोमँटिक फोटो व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं रविवारी पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) सोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला. विराट-अनुष्का लवकरच आई-बाबा बनणार आहेत. विराटनं इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( IPL 2020) युएईत दाखल होण्यापूर्वी ही गोड बातमी दिली होती. त्यामुळेच विराट पत्नी अनुष्कासह युएईत दाखल झाला. RCBच्या सामन्यांना अनुष्काही स्टेडियमवर उपस्थित राहिलेली पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी RCBनं एबी डिव्हिलियर्सच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला नमवून Point Tableवर तिसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. आता RCBचा पुढील सामना बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहे आणि तत्पूर्वी विराट रिलॅक्स मूडमध्ये दिसला. त्याचा अन् अनुष्काचा हा फोटो एबी डिव्हिलियर्सनं काढला आहे.


राजस्थान रॉयल्सच्या ६ बाद १७७ धावांच्या प्रत्युत्तरात आरोन फिंच ( १४) धावफलकारवर २३ धावा असताना श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर माघारी परतला. RRच्या गोलंदाजांनी RCBच्या धावगतीला लगाम लावला खरा, परंतु त्यांना विकेट घेण्यात अपयश आले. विराट कोहली आणि देवदत्ती पडीक्कल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना RCBच्या डावाला आकार दिला. ही जोडी RCBला सहज विजय मिळवून देईल, असेच चित्र होते. पण, राहुल टेवाटियानं RRला यश मिळवून देताना पडीक्कलला ( ३५) बाद केले. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कार्तिक त्यागीनं RCBचा कर्णधार विराटला बाद केले. राहुल टेवाटियानं सीमारेषेवर अफलातून झेल घेत RCBला दोन धक्के दिले. विराट ४३ धावांवर माघारी परतला. 

पण, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सचे वादळ घोंगावलं. जयदेव उनाडकटच्या षटकात त्यानं सलग तीन षटकार खेचले. १२ चेंडूंत विजयासाठई ३५ धावांची आवश्यकता असताना एबीनं १९व्या षटकात २५ धावा चोपून सामना RCBच्या बाजूनं झुकवला. त्यामुळे अखेरच्या षटकात RCBला विजयासाठी १० धावा हव्या होत्या आणि एबीनं त्या सहज करून दिल्या. RCBनं हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. एबीनं २२ चेंडूंत १ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ५५ धावा केल्या. गुरकिरत सिंग मनने नाबाद १९ धावा करून त्याला योग्य साथ दिली. 
 

Web Title: IPL 2020 : Virat Kohli share Romantic Photo with Anushka Sharma, pic credit to AB de Villiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.