IPL 2020: ज्या दिग्गजाला केलं क्लीन बोल्ड; त्याच्याकडूनच वरुण चक्रवर्थीनं घेतल्या टीप्स

CSK vs KKR, varun chakravarthy & MS Dhoni News: विशेष म्हणजे धोनीचा खेळ पाहण्यासाठी चक्रवर्थी चेपॉक स्टेडियमवर नेहमी जायचा. मात्र आता त्याच धोनीला वरुणने दोनवेळा क्लीन बोल्ड केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 01:07 PM2020-10-30T13:07:07+5:302020-10-30T13:13:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: The veteran who did clean bold; Tips taken by Varun Chakraborty from MS Dhoni | IPL 2020: ज्या दिग्गजाला केलं क्लीन बोल्ड; त्याच्याकडूनच वरुण चक्रवर्थीनं घेतल्या टीप्स

IPL 2020: ज्या दिग्गजाला केलं क्लीन बोल्ड; त्याच्याकडूनच वरुण चक्रवर्थीनं घेतल्या टीप्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) म्हणजे युवा खेळाडूंसाठी जणू जिवंत क्रिकेट युनिव्हर्सिटीच. त्याच्यासोबत घालवलेले काही क्षण युवा खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्याही त्याच्याविरुद्ध खेळताना त्याला बाद करणे हे प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न. हे स्वप्न साकार झाले कोलकाताच्या (Kolkata Knight Riders) वरुण चक्रवर्थीचे. मात्र यावेळी त्याने धोनीसारख्या दिग्गजला तब्बल दोनवेळा बाद केले. त्यामुळे सध्या त्याच्यासाठी आकाश ठेंगणे झाले आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यातही चक्रवर्थीने धोनीला क्लीन बोल्ड केले आणि सामन्यानंतर त्याने धोनीची भेट घेत त्याच्याकडून मोलाच्या टिप्सही घेतल्या. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे धोनीचा खेळ पाहण्यासाठी चक्रवर्थी चेपॉक स्टेडियमवर नेहमी जायचा. मात्र आता त्याच धोनीला वरुणने दोनवेळा क्लीन बोल्ड केले आहे. चेन्नईने या सामन्यात कोलकाताला 6 गड्यांनी नमवले. सामना संपल्यानंतर धोनी आणि वरुण चर्चा करत असल्याचे दिसले. कोलकातानेही आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा व्हिडिओ अपलोड केला असून चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

या व्हिडिओमध्ये वरुण धोनीसोबत गंभीर चर्चा करत असल्याचे दिसत आहे. यावेळी धोनी वरुणला महत्त्वाच्या टीप्स देत असयाचे दिसले. 16 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये धोनी आणि वरुण डग आऊटजवळ उभे राहून चर्चा करत असल्याचे पाहण्यास मिळते. 

Web Title: IPL 2020: The veteran who did clean bold; Tips taken by Varun Chakraborty from MS Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.