IPL 2020: बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड; रंगतदार लढतीची अपेक्षा

उभय संघांदरम्यान रंगतदार लढतीची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 01:37 AM2020-11-08T01:37:13+5:302020-11-08T07:03:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Sunrisers Hyderabad's heavyweights against strong Delhi Capitals; Expect a colorful fight | IPL 2020: बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड; रंगतदार लढतीची अपेक्षा

IPL 2020: बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड; रंगतदार लढतीची अपेक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबूधाबी : इडियन प्रीमियर लीगमध्ये योग्य वेळी सूर गवसलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला रविवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत फॉर्मात असलेल्या हैदराबाद संघाचे पारडे वरचढ ठरण्याची शक्यता आहे. उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. या लढतीतील विजेत्या संघाला फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळावे लागेल.  

सनरायझर्स हैदराबाद संघासाठी गेले चार सामने ‘करा अथवा मरा’ अशा धरतीचे होते, पण संघाने सर्वच सामन्यांत विजय मिळवला. सुरुवातीच्या सामन्यांत शानदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने अखेरच्या टप्प्यात मात्र लय गमावली. सुरुवातीच्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हैदराबाद संघाला पुनरागमन करण्याचे श्रेय कर्णधार डेव्हिड वॉर्नरला जाते. त्याने आपल्या खेळाडूंचा शानदार वापर केला. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर सुरुवातीच्या सात सामन्यात विजय मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला गेल्या सहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या योजनांना धक्का बसला आहे.

युवा कर्णधार अय्यर स्पर्धेच्या १३ व्या सत्रात संघाला प्रथमच फायनल गाठून देण्यास प्रयत्नशील आहे तर वॉर्नर २०१६ च्या यशाची पुनरावृत्ती करीत दुसऱ्यांदा जेतेपद उंचावण्यासाठी उत्सुक आहे. वॉर्नर पुढील दोन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला तर स्पर्धेत सर्वात कमी अनुभव असलेल्या खेळाडूंसह विजय मिळवणारा कर्णधार ठरेल.  दिल्ली संघासाठी सर्वात चिंतेची बाब त्यांच्या आघाडीच्या फळीचे अपयश आहे. शिखर धवन (१५ सामने, ५२५ धावा) याने चांगली कामिगरी केली असली तरी गेल्या काही सामन्यांमध्ये मात्र तो अपयशी ठरला.

मजबूत बाजू-

दिल्ली : शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत मोठी खेळी करण्यास सक्षम. रबाडा, ऑनरिख नॉर्खिया, अश्विन फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम. स्टोईनिस अष्टपैलुत्व सिद्ध करण्यास सज्ज.
हैदराबाद : डेव्हिड वॉर्नरचे कल्पक नेतृत्व.  केन विलियम्सनचा अनुभव जमेची बाजू. संदीप शर्मा, टी. नटराजन गोलंदाजांच्या समावेशामुळे गोलंदाजीची बाजू मजबूत.

कमजोर बाजू-

दिल्ली : गेल्या काही सामन्यांत सलामीवीरांचे अपयश. पहिल्या क्वालिफायरमध्ये गोलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश.
हैदराबाद : मधल्या फळीचे अपयश. प्रियम गर्ग, अब्दुल समद यांना विशेष अनुभव नाही. आघाडीची फळी अपयशी ठरली तर दडपण येण्याची शक्यता.

Web Title: IPL 2020: Sunrisers Hyderabad's heavyweights against strong Delhi Capitals; Expect a colorful fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.