IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज विजय; साक्षी धोनीनं केलेली पोस्ट झाली व्हायरल

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघाला रविवारी चेन्नई  सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) सहज पराभूत केले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 5, 2020 04:20 PM2020-10-05T16:20:25+5:302020-10-05T16:20:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Sakshi Dhoni reacts as Shane Watson, Faf du Plessis help CSK thump KXIP by 10 wickets  | IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज विजय; साक्षी धोनीनं केलेली पोस्ट झाली व्हायरल

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज विजय; साक्षी धोनीनं केलेली पोस्ट झाली व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघाला रविवारी चेन्नई  सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) सहज पराभूत केले. शेन वॉटसन ( Shane Watson) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना संघाला दहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला. KXIPचे 179 धावांचे लक्ष्य CSKनं एकही विकेट न गमावता पार केले. 2013नंतर CSKनं पुन्हा एकदा KXIPवर दहा विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयाने CSKची गाडी रुळावर आली. विजयानंतर महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिनं इस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली. 

प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी दणक्यात सुरुवात  करून दिली. लोकेश राहुल ( ६३), मयांक अग्रवाल ( २६), मनदीप सिंग ( २७) निकोलस पूरन ( ३३) यांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने ४ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारली. CSKकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानंही केली नसावी. फॉर्माशी झगडत असलेल्या शेन वॉटसननं KXIPच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याच्या जोडीला फॅफ ड्यू प्लेसिस होताच. आतापर्यंत सलामीच्या जोडीचं अपयश CSKची डोकेदुखी ठरत होती, त्याच सलामीवीरांनी विजयाचा मजबूत पाया रचला. 

या दोघांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दमदार भागीदारी केली. वॉटसन ५३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या, तर फॅफनं ५३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ८७ धावांवर नाबाद राहीला. चेन्नईनं १७.४ षटकांत बिनबाद १८१ धावा केल्या. या विजयानंतर साक्षीची इस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे.

Web Title: IPL 2020: Sakshi Dhoni reacts as Shane Watson, Faf du Plessis help CSK thump KXIP by 10 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.