IPL 2020 : आरसीबीविरुद्ध हुकलेला ‘हा’ विक्रम आज साधण्याची रोहित शर्माकडे सुवर्णसंधी

IPL 2020, Rohit Sharma News : याआधी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध मुंबईला सुपर ओव्हरमध्ये निसटता पराभव पत्करावा लागला होता. याच सामन्यात रोहितला आयपीएलमधील मोठा विक्रम नोंदवण्याची संधी चालून आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:03 PM2020-10-01T15:03:26+5:302020-10-01T15:06:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Rohit Sharma has a golden opportunity to break the this record against RCB | IPL 2020 : आरसीबीविरुद्ध हुकलेला ‘हा’ विक्रम आज साधण्याची रोहित शर्माकडे सुवर्णसंधी

IPL 2020 : आरसीबीविरुद्ध हुकलेला ‘हा’ विक्रम आज साधण्याची रोहित शर्माकडे सुवर्णसंधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआजच्या लढतीत सर्वांचे लक्ष लागले आहे ते ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) महत्त्वाच्या विक्रमाकडेरोहितने पंजाबविरुद्ध २ धावा केल्यास तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करेलआयपीएलमध्ये आतापर्यंत कोहली आणि सुरेश रैना यांनीच ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत

 मुंबई - Indian Premier League (IPL 2020) मधील आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indinas) कंबर कसली आहे. कारण आज त्यांना सामना करायचा आहे तो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या (Kings XI Punjab)  फलंदाजांचा. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीत मुंबईकरांचा संघ पंजाबच्या तुलनेत अधिक समतोल आहे. मात्र तरीही गेल्या काही सामन्यांतील पंजाबची कामगिरी पाहता मुंबईला विजय मिळवणे सोपे जाणार नाही. त्यातच सर्वांचे लक्ष लागले आहे ते ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) महत्त्वाच्या विक्रमाकडे.

याआधी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध मुंबईला सुपर ओव्हरमध्ये निसटता पराभव पत्करावा लागला होता. याच सामन्यात रोहितला आयपीएलमधील मोठा विक्रम नोंदवण्याची संधी चालून आली होती. यासह त्याने विराट कोहली आणि सुरेश रैना या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले होते. हा विक्रम गाठण्यासाठी रोहितला केवळ १० धावांची गरज होती, मात्र तो केवळ ८ धावा करुन बाद झाला आणि आता त्याला कोहली, रैना यांची बरोबरी करण्यासाठी पंजाबविरुद्धच्या सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

रोहितने पंजाबविरुद्ध २ धावा केल्यास तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोहली आणि सुरेश रैना यांनीच ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे पंजाबविरुद्ध २ धावा केल्यानंतर रोहित, कोहली आणि रैना यांची बरोबरी करेल. कोहलीच्या नावावर सर्वाधिक ५,४३० धावांची नोंद असून त्यानंतर रैनाने ५,३६८ धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर सध्या ४,९९८ धावा आहेत.

Web Title: IPL 2020: Rohit Sharma has a golden opportunity to break the this record against RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.