IPL 2020 : म्हणून मुंबई इंडियन्सला नमवूनही विराट कोहली आहे चिंतेत!

सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 05:26 PM2020-09-29T17:26:53+5:302020-09-29T17:32:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: RCB's Caption Virat Kohli is worried even after beating Mumbai Indians! | IPL 2020 : म्हणून मुंबई इंडियन्सला नमवूनही विराट कोहली आहे चिंतेत!

IPL 2020 : म्हणून मुंबई इंडियन्सला नमवूनही विराट कोहली आहे चिंतेत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआम्हाला क्षेत्ररक्षणावर अधिक मेहनत घेण्याची गरज आहेआम्ही पोलार्डचा तो एक झेल पकडला असता, तर सामना इतका खेचलाच गेला नसताआम्ही नक्कीच थोडक्यात जिंकलो, पण मैदानावर होणा-या लहान लहान गोष्टीही महत्त्वाचे ठरतात

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Banglore) सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभूत केले. कसाबसा अखेरचा चेंडू चौकार मारत कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)  मुंबईविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात आरसीबीने वर्चस्व राखलेले, मात्र अखेरच्या ५ षटकांमध्ये मुंबईकरांनी केलेला तुफानी हल्ला निर्णायक ठरला. त्यामुळेच संघाला आपल्या खेळातील काही गोष्टींवर अधिक मेहनत घ्यावी लागेल, असे सांगत कर्णधार कोहलीने सामना जिंकल्यानंतर चिंता व्यक्त केली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला आरसीबीने ७ धावांवर रोखले. यानंतर आरसीबीने बाजी मारली खरी, पण त्यासाठी त्यांना अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज द्यावी लागली. सामन्यानंतर कोहलीने म्हटले की, ‘माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही. सामन्यात अनेक चढ-उतार झाले, माझ्यामते त्यांनी चांगला खेळ केला. आम्ही रणनितीनुसार खेळ करण्याचा प्रयत्न केला. आम्ही नक्कीच थोडक्यात जिंकलो, पण मैदानावर होणा-या लहान लहान गोष्टीही महत्त्वाचे ठरतात.’

कोहली संघाच्या क्षेत्ररक्षणावर नाराज दिसला. खेळाडूंना क्षेत्ररक्षणामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागेल असे सांगताना कोहली म्हणाला की, ‘संघात सर्वोत्तम फलंदाज कोण आहेत याचा विचार करुनच सुपरओव्हरमध्ये मी आणि एबी मैदानावर गेलो. पुढे येऊन जबाबदारी घेण्यासारखे हे होते. आम्हाला क्षेत्ररक्षणावर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. जर आम्ही पोलार्डचा तो एक झेल पकडला असता, तर सामना इतका खेचलाच गेला नसता.’
 

Web Title: IPL 2020: RCB's Caption Virat Kohli is worried even after beating Mumbai Indians!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.