IPL 2020 : हेलिकॉप्टर शॉट तरीही राशिद खान एकाच चेंडूवर दोन वेळा बाद 

सनरायजर्स हौदराबादकडून खेळणारा अफगाणचा फिरकीपटू राशिद खान हा चेन्नई सुपर किंग्ज विरोधात हिट विकेट झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 10:45 PM2020-10-14T22:45:54+5:302020-10-14T22:46:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Rashid Khan's Bizarre 'Twin' Dismissal in Same Ball Makes Twitter Revisit Cricket Laws | IPL 2020 : हेलिकॉप्टर शॉट तरीही राशिद खान एकाच चेंडूवर दोन वेळा बाद 

IPL 2020 : हेलिकॉप्टर शॉट तरीही राशिद खान एकाच चेंडूवर दोन वेळा बाद 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सनरायजर्स हौदराबादकडून खेळणारा अफगाणचा फिरकीपटू राशिद खान हा चेन्नई सुपर किंग्ज विरोधात हिट विकेट झाला. मात्र तो तसा नसता तरी तो झेलबाद झालाच होता. कारण शार्दुलच्या गोलंदाजीवर त्याच चेंडूवर त्याने मारलेला हेलिकॉप्टर शॉट थेट दीपक चहरच्या हाती विसावला होता. अशा प्रकारे राशिद खान एकाच चेंडूवर दोन वेळा बाद झाला.

सनरायजर्सकडून खेळताना १८ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर राशिद खानने शार्दुल ठाकूरच्या लो फुल टॉसवर शानदार हेलिकॉप्टर शॉट लगावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी त्याचे संतुलन बिघडले आणि त्याचा पाय आॅफ स्टम्पला लागला.  त्याचा हेलिकॉप्टर शॉट देखील परफेक्ट नव्हता. लाँग आॅन वर असलेल्या दीपक चहारने हा सोपा झेल घेतला होता. मात्र त्या आधीच त्याचा पाय लागलेला असल्याने त्याला हीट विकेट देण्यात आले. ही बाब मात्र तोपर्यंत चहरला कळली नव्हती. झेल घेतल्याचा आनंद साजरा करायला लागल्यावर त्याला कळले की राशिदचा पाय आधीच स्टम्पला लागला आहे.

Web Title: IPL 2020 : Rashid Khan's Bizarre 'Twin' Dismissal in Same Ball Makes Twitter Revisit Cricket Laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.