IPL 2020 : क्रिकेटर राहुलसाठी बेभान झाला पडद्यावरचा राहुल; किंग खानचे हटके सेलिब्रेशन

IPL 2020 News : चेन्नईचा पराभव झाल्यानंतर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राहुल त्रिपाठी गेला, तेव्हा केकेआरचा मालक आणि बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान बेभान झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 05:46 PM2020-10-08T17:46:36+5:302020-10-08T17:49:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Rahul on screen happy for cricketer Rahul; King Khan's Hatke Celebration | IPL 2020 : क्रिकेटर राहुलसाठी बेभान झाला पडद्यावरचा राहुल; किंग खानचे हटके सेलिब्रेशन

IPL 2020 : क्रिकेटर राहुलसाठी बेभान झाला पडद्यावरचा राहुल; किंग खानचे हटके सेलिब्रेशन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - Indian Premier League (IPL 2020) मध्ये बुधवारी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या (Chennai Superkings)  सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Roders) जबरदस्त खेळ करताना 10 धावांनी बाजी मारली. या विजयाचा शिल्पकार ठरला तो सलामीवीर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi). यंदाच्या मोसमात मधल्या फळीत खेळल्यानंतर पहिल्यांदाच राहुलला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. ही संधी त्याने साधताना 51 चेंडूंत 81 धावांची धमाकेदार खेळी खेळली. यामुळेच मॅन ऑफ दी मॅचही राहुलच ठरला. सामना झाल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी राहुल जेव्हा गेला, तेव्हा ‘पडद्या’वरचा राहुल बेभान झाला. सोशल मीडीयावरही सध्या हीच चर्चा रंगली आहे.

चेन्नईचा पराभव झाल्यानंतर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राहुल त्रिपाठी गेला, तेव्हा केकेआरचा मालक आणि बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान बेभान झाला. यावेळी शाररुखने ओरडून म्हटले की, ‘राहुल, नाम तो सुना ही होगा!’ याबाबतचा शाहरुखचा एक व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे. पुरस्कार वितरणाचा व्हिडिओही व्हायरल होत असून यामध्ये दिसून येतं की, जेव्हा राहुल त्रिपाठी सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यात येतो तेव्हा पाठीमागून शाहरुख खान जोर जोराने म्हणतोय, ‘राहुल, नाम तो सुना ही होगा!’ शाहरुखच्या या वाक्याने राहुल त्रिपाठीलाही हसू आवरता येत नव्हते.



याशिवाय शाहरुखने ट्वीटही केले आहे. केकेआरने सामन्यानंतर ट्वीट केले की, ‘ज्या फिल्ममध्ये राहुलमध्ये राहुल असतो, ती फिल्म सुपरहीट असते.’ यावर प्रतिक्रिया देताना शाहरुखने ट्वीट केले की, ‘अगदी बरोबर’. त्याचप्रमाणे सामन्याविषयी शाहरुखने ट्वीट केले की, ‘आम्ही काही धावांनी कमी पडलो, पण गोलंदाजांनी शेवटी शानदार कामगिरी केली. केकेआरच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. खास करुन उल्लेख करावासा वाटतो राहुल त्रिपाठीचा.. नाम तो सुना था, काम उससे भी कमाल है!’ 

 

Web Title: IPL 2020: Rahul on screen happy for cricketer Rahul; King Khan's Hatke Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.