IPL 2020 : CSKनं पक्क केलं मुंबई इंडियन्सचं Play Offचं तिकिट, पण इतरांचं बिघडवलं गणित!

MIचं स्थान पक्कं झाल्यानंतर आता उर्वरित तीन जागांसाठीची चुरस वाढली आहे. उर्वरित सहा संघांनाही येथे एन्ट्री घेण्याची संधी आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 30, 2020 04:38 PM2020-10-30T16:38:05+5:302020-10-30T16:39:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Mumbai Indians's playoff spot confirmed, but top-four race wide open as CSK trip up KKR | IPL 2020 : CSKनं पक्क केलं मुंबई इंडियन्सचं Play Offचं तिकिट, पण इतरांचं बिघडवलं गणित!

IPL 2020 : CSKनं पक्क केलं मुंबई इंडियन्सचं Play Offचं तिकिट, पण इतरांचं बिघडवलं गणित!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या ४९व्या सामन्यानंतर अखेरीस प्ले ऑफसाठी एक संघ पात्र ठरला. चेन्नई सुपर किंग्सचं ( Chennai Super Kings) प्ले ऑफचे आधीच संपुष्टात आले असले तरी त्यांनी गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) विजय मिळवून मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) तिकिट पक्कं केलं. मुंबई इंडियन्सनं ( MI) १६ गुणांसह प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित केलाच होता, पण KKRच्या पराभवानं त्यावर शिक्कामोर्तब केलं. आतापर्यंत चौथ्या स्थानावर चिकटून बसलेल्या KKRची गाडी घसरली आणि आता त्यांना संघर्ष करावा लागत आहे. MIचं स्थान पक्कं झाल्यानंतर आता उर्वरित तीन जागांसाठीची चुरस वाढली आहे. उर्वरित सहा संघांनाही येथे एन्ट्री घेण्याची संधी आहे.


कोलकाता नाईट रायडर्सः  १३ सामने, १२ गुण, नेट रन रेट -०.४६७
उर्वरित सामना वि. राजस्थान रॉयल्स  
CSKविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानं KKRला आता १४ गुणांपर्यंत मजल मारता येईल. त्या जोरावर ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतात, परंतु त्यासाठी त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. किंग्स इलेव्हन पंजाबला दोन्ही सामने गमवावे लागतील, तर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे एकापेक्षा अधिक सामना जिंकता कामा नये. असे घडल्यास KKR प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतील. तसे न झाल्यास नेट रन रेटवर त्यांच्यासमोर RRचे आव्हान असेल, सध्या RRचा नेट रन रेट -०.५०५ असा आहे. राजस्थानच्या खात्यात १० गुण आहेत आणि दोन सामन्यांत ते त्यांचा नेट रन रेट सुधारू शकतात.  

किंग्स इलेव्हन पंजाबः १२ सामने, १२ गुण, नेट रन रेट -०.०४९
उर्वरित सामना वि. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स
KKRच्या पराभवानं अन्य संघांना संधी दिली आहे आणि KXIP त्यापैकी एक आहे. त्यांनी सलग पाच विजय मिळवून सर्वांना थक्क केले आहे आणि उर्वरित दोन सामने जिंकून ते प्ले ऑफमध्ये सहज प्रवेश करू शकतील. त्यांनी दोनपैकी १ सामना जरी जिंकला तरी १४ गुणांसह ते नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतात. शुक्रवारी राजस्थानविरुद्ध पराभव झाल्यास KXIPला आव्हान कायम ठेवण्यासाठी एक संधी आहे. पण, त्यांनाही मग अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. सध्या SRHचा नेट रन रेट हा चांगला आहे आणि त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकल्यास KXIPचे आव्हान संपुष्टात येईल.

राजस्थान रॉयल्सः १२ सामने, १० गुण, नेट रन रेट -०.५०५
उर्वरित सामने वि. किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स
RRचा नेट रन रेट -०.५०५ असा आहे आणि त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित दोनी सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागतील. चेन्नई सुपर किंग्सनं फॉर्म कायम राखून पंजाबला पराभूत करण्याचीही प्रतीक्षा त्यांना पाहावी लागेल. शिवाय हैदराबादनं एकपेक्षा अधिक मिळवता कामा नये, याकडेही त्यांना लक्ष ठेवावे लागेल. तरच RR प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतील.  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूः १२ सामने, १४ गुण, नेट रन रेट ०.०४८
उर्वरित सामना वि. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स 
RCBनं दोनपैकी एक सामना जिंकला तरी ते प्ले ऑफ तिकिट निश्चित करतील. त्यांनी दोन सामने गमावले तरी नेट रन रेटच्या जोरावर ते प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहू शकतील. त्यासाठी त्यांना अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. दोन्ही सामने गमावल्यास त्यांच्या नेट रन रेटवरही परिणाम होईल. त्यामुळे १४ गुणांची कमाई करणाऱ्या अन्य संघांचा नेट रन रेट जास्त राहिल्यास, RCBची डोकेदुखी वाढू शकेल. 

दिल्ली कॅपिटल्सः १२ सामने, १४ गुण, नेट रन रेट ०.०३०
उर्वरित सामने वि. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 
RCBप्रमाणे दिल्ली कॅपिटल्ससाठीची प्ले ऑफचं समिकरण समान असेल. त्यांनाही एक सामना जिंकून प्ले ऑफचं तिकिट पक्कं करता येईल, परंतु दोन्ही सामने गमावल्यास त्यांना नेट रन रेटच्या आधारावर अवलंबून रहावे लागेल. 

सनरायझर्स हैदराबादः १२ सामने, १० गुण, नेट रन रेट - ०.३९६
उर्वरित सामने वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स
SRHसाठी पात्रता फेरीचं समिकरण सोपं आहे. त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांचा नेट रन रेट हा इतरांपेक्षा चांगला आहे.
 

Web Title: IPL 2020: Mumbai Indians's playoff spot confirmed, but top-four race wide open as CSK trip up KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.