IPL 2020 Mid season Transfer Window : अजिंक्य रहाणे, ख्रिस लीन यांच्याबाबत मोठे अपडेट्स; मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्सचं महत्त्वाचे विधान  

Indian Premier League (IPL 2020) Mid Transfer Window ला आजपासून सुरुवात झाली. १३वे पर्व मध्यंतरात आले आहे. सर्व संघांनी प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२०च्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) या दोन संघांची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 13, 2020 03:37 PM2020-10-13T15:37:18+5:302020-10-13T15:38:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Mid season Transfer Window : Transfer Window kicks in, Delhi Capitals not to trade Ajinkya Rahane and Chris lynn   | IPL 2020 Mid season Transfer Window : अजिंक्य रहाणे, ख्रिस लीन यांच्याबाबत मोठे अपडेट्स; मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्सचं महत्त्वाचे विधान  

IPL 2020 Mid season Transfer Window : अजिंक्य रहाणे, ख्रिस लीन यांच्याबाबत मोठे अपडेट्स; मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्सचं महत्त्वाचे विधान  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League (IPL 2020) Mid Transfer Window ला आजपासून सुरुवात झाली. १३वे पर्व मध्यंतरात आले आहे. सर्व संघांनी प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२०च्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) या दोन संघांची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. पण, यंदा सप्राईज पॅकेज ठरत आहेत तो विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore)... मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिघांनी ७ पैकी ५ सामने जिंकून प्रत्येकी १० गुणांसह Point Tableमध्ये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना आता उर्वरीत ७ पैकी ३ विजयही Play Off मध्ये स्थान पक्के करण्यासाठी पुरेसे आहेत. ( IPL 2020च्या मध्यंतरानंतर तीन संघ Play Offच्या शर्यतीत आघाडीवर; CSKसह अन्य संघांना घ्यावी लागेल प्रचंड मेहनत! )

उरलेल्या एका जागेसाठी चांगली चुरस रंगण्याची शक्यता आहे. त्यात Mid Season Transfer मुळे पहिल्या टप्प्यातील उणीवा दूर करण्यासाठी सर्व संघ आपापल्या ताफ्यात आवश्यक तो बदल करण्यासाठी खेळाडूंची अदलाबदलही करणार आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंसह सर्व संघ प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी जीवाचं रान करेल हे मात्र नक्की. या ट्रेडिंगमध्ये सर्वात जास्त चर्चिलं गेलेलं नाव म्हणजे अजिंक्य रहाणेचं ( Ajinkya Rahane)... राजस्थान रॉयल्सकडून ट्रेडिगं केलेल्या अजिंक्यला दिल्ली कॅपिटल्सनं परवापर्यंत एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नव्हती. मुंबई इंडियन्स ( MI) विरुद्ध रहाणे IPL 2020चा पहिला सामना खेळला, पण त्यात त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्यात चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) सुरेश रैनाची रिप्लेसमेंट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या संघावर प्रथमच प्ले ऑफ न खेळण्याची नामुष्की ओढावली आहे. ( IPL 2020 Mid Season Transfer window आजपासून उघडली; जाणून घ्या कोणते खेळाडू जाऊ शकतात दुसऱ्या संघात!

संघाची घडी बसवण्यासाठी CSK अजिंक्य रहाणेला घेण्यास उत्सुक असल्याची चर्चा होती आणि आजपासून सुरु झालेल्या मिड सीजन ट्रान्सफर विंडोत रहाणेचं नाव पहिलं आलं. त्यावर दिल्ली कॅपिटल्सनं स्पष्टच मत मांडलं.  दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,'' अजिंक्य रहाणे हा दिल्ली संघाचा अविभाज्य भाग  आहे आणि त्याला मिड सीजन ट्रान्सफर विंडोत ट्रेड करण्यासाठी आम्ही घेतलेलं नाही. बाहेर जी काही चर्चा सुरू आहे, त्यावर आम्ही लक्ष देत नाही. तो संघासाठी त्याच्यापरीनं योगदान देत आहे.''  

अजिंक्य रहाणेची IPL मधील कामगिरी - 140 सामने, 3820 धावा, 105* सर्वोत्तम, 2 शतकं व 27 अर्धशतकं, 404 चौकार , 74 षटकार, 55 झेल, 1 विकेट

अजिंक्यसह मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लीनचीही चर्चा होती, परंतु मुंबई इंडियन्सनं त्या चर्चा फेटाळून लावल्या. 
 

काय आहे हे IPL 2020 Mid-Season Transfers? 
BCCIने यंदाच्या मोसमापासून फ्रँचायझींना अन्य संघांकडून खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा दिली आहे. मागील मोसमात ही संधी केवळ अन कॅप म्हणजेच राष्ट्रीय संघांकडून न खेळलेल्या खेळाडूंपुरती मर्यादित होती, परंतु आता राष्ट्रीय खेळाडूंचीही अदलाबदल शक्य आहे.

IPL 2020 Mid-Season Transfers नियम 
लीगच्या मध्यंतरापर्यंत खेळाडूनं दोनपेक्षा अधिक सामने खेळलेले नसावेत. लीगच्या मध्यंतरानंतरच ही अदलाबदल करता येणार आहे. म्हणजे प्रत्येक संघानं प्रत्येकी ७ सामने खेळणे आवश्यक आहेत.

कोणते खेळाडू ठऱणार पात्र? 
दोनपेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंची अदलाबदल करता येईल.
अदलाबदल करताना खेळाडूला देण्यात येणारी रक्कम फ्रँचायझीच्या पर्समधून वजा होणार नाही.

Web Title: IPL 2020 Mid season Transfer Window : Transfer Window kicks in, Delhi Capitals not to trade Ajinkya Rahane and Chris lynn  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.