IPL 2020 MI vs CSK Latest News : गचाळ क्षेत्ररक्षणानं मुंबई इंडियन्सचा घात केला; रायुडू-फॅफनं CSKला विजय मिळवून दिला

IPL 2020 MI vs CSK Latest News: अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांनी शतकी भागीदारी करून CSKचा डाव सावरला.  

By स्वदेश घाणेकर | Published: September 19, 2020 11:23 PM2020-09-19T23:23:05+5:302020-09-20T07:08:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 MI vs CSK Latest News: Poor fielding hurts Mumbai Indians; Chennai Super Kings won by 5 wickets | IPL 2020 MI vs CSK Latest News : गचाळ क्षेत्ररक्षणानं मुंबई इंडियन्सचा घात केला; रायुडू-फॅफनं CSKला विजय मिळवून दिला

IPL 2020 MI vs CSK Latest News : गचाळ क्षेत्ररक्षणानं मुंबई इंडियन्सचा घात केला; रायुडू-फॅफनं CSKला विजय मिळवून दिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबई इंडियन्सला सलग 8 व्या पर्वात पहिला सामना जिंकता आलेला नाहीसौरभ तिवारीच्या 42 धावांच्या जोरावर मुंबईनं समाधानकारक धावा केल्याCSK साठी अंबाती रायुडू व फॅफ डू प्लेसिस यांची अर्धशतकी खेळी

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिल्या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. पहिल्या डावात सामन्याचे पारडे दोन्ही संघांच्या पारड्यात झुलते राहिले. कधी मुंबई वरचढ होताना दिसला, तर कधी चेन्नई... पण, CSKच्या गोलंदाजांनी अखेरच्या 6 षटकांत MIच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली. त्यानंतर पहिल्या दोन षटकांत CSKचे दोन फलंदाज माघारी पाठवल्यानंतर MI थोडेसे निश्चिंत झाले. त्यामुळे त्यांच्याकडून क्षेत्ररक्षणात चूका केल्या आणि त्याचा भुर्डंद त्यांना सहन करावा लागला. अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांनी शतकी भागीदारी करून CSKचा डाव सावरला. त्यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. ट्रेट बोल्ट आणि जेम्स पॅटिनसन यांनी CSKला दोन मोठे धक्के दिले.

रोहित शर्मा- क्विंटन डी कॉकची सावध सुरूवात पण...
रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या रोहितनं CSK गोलंदाज दीपक चहर याचं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून स्वागत केलं. इतक्या दिवसांनी बॅटवर हात साफ करण्याची संधी रोहित या सामन्यात सोडणार नाही, त्याची फटकेबाजी पाहून असेच वाटत होते. पण, महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चतुर नेतृत्वानं सामन्यात रंगत आणली. धोनीनं पाचवं षटक पीयूष चावलाला ( Piyush Chawla) पाचारण केलं आणि त्याच्या गुगलीसमोर रोहित फसला. तो सॅम कुरनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. 

सौरभ तिवारी-सूर्यकुमार यादवची संयमी खेळी...
पुढील षटकात क्विंटनही बाद झाला. यावेळी कुरनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो शेन वॉटसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. क्विंटनने 20 चेंडूंत 5 चौकारांसह 33 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचे ( MI) दोन्ही सलामीवीर 48 धावांत माघारी परतल्यानंतर CSK सामन्यात कमबॅक करण्याच्या तयारीत होते, पण, सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MI चा डाव सावरला. मुंबईने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 86 धावा केल्या. पण, 11 व्या षटकात MIला तिसरा धक्का बसला. हार्दिक पांड्याही ( Hardik Pandya) बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर उतरला. त्याने सुरुवातीला फटकेबाजी केली. दुसऱ्या बाजूने सौरभ तिवारी फटकेबाजी करत होता. 

फॅफ डू प्लेसिसचे दोन अप्रतिम झेल, सामन्याला मिळाली कटालणी...
पण, 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजानं त्याला बाद केलं. फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf  du Plessis ) सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. तिवारी 31 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार मारून 42 धावांत बाद झाला. त्याच षटकात फॅफनं आणखी एक सुरेख झेल टिपून हार्दिक पांड्याला माघारी पाठवले. हार्दिकने 14 धावा केल्या. MIच्या 15 षटकांत 5 बा 126 धावा झाल्या होत्या.  कृणाल पांड्या ( Krunal Pandya) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) हे मोठी खेळी करतील अशी अपेक्षा होती. पण, चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांना यश मिळवू दिले नाही. जेम्स पॅटिन्सनही ( 11) लगेच बाद झाला. मुंबई इंडियन्सला ( MI) 20 षटकांत 9 बाद 162 धावांवर समाधान मानावे लागले. लुंगी एनगिडीनं 38 धावांत 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं ( 42/2) दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. 

अंबाती रायुडू - फॅफ डू प्लेसिसची शतकी भागीदारी...
धावांचा पाठलाग करताना CSKचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकांत माघारी परतले. शेन वॉटसन ( 4) आणि मुरली विजय ( 1) यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी पायचीत केले. मुरलीनं ( Murali Vijay) ने DRS घेतला असता तर त्याची विकेट वाचली असती. DRS reviweमध्ये चेंडू तिसऱ्या स्टम्पच्या बाजूनं जात असल्याचे दिसत होते. त्यानंतर अंबाती रायुडू व फॅफ डू प्लेसिस यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा दिसला. रायुडू आणि डू प्लेसिसनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रायुडू 70 धावांवर असताना कृणाल पांड्यानं त्याचा झेल सोडला. पण, त्याच षटकात राहुल चहरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर रायुडूचा सुरेख झेल टिपला. रायुडू 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 71 धावांवर माघारी परतला. 

महेंद्रसिंग धोनी का आला नाही?
अंबाती रायुडू बाद झाल्यावर फलंदाजीला रवींद्र जडेजा आला. तोही 10 धावा करून माघारी परतला. त्यानंतर MS Dhoni येईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, धोनीनं सॅम कुरनला पाठवले. धोनीला खेळपट्टीवर लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन ठेवायचे होते आणि त्यामुळे त्यानं कुरनला पाठवले. कुरन 5 चेंडूंत दहा धावा करून माघारी परतला अन् धोनी मैदानावर आला. फॅफने 42 धावांत अर्धशतक पूर्ण केले. दीड वर्षानंतर मैदानावर उतलेल्या धोनीला पहिल्याच चेंडूंवर पंचांनी बाद दिले. पण,  DRSघेत धोनीनं पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात विजयासाठी 5 धावांची गरज असताना फॅफनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. पुढच्या चेंडूवर चौकार खेचून फॅफनं CSKला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. 

आजच्या सामन्यातील विक्रम

रोहित शर्माची घेतलेली विकेट पीयूष चावलासाठी ठरली विक्रमी

फॅफ ड्यू प्लेसिसचे अफलातून झेल; सौरभ तिवारी अन् हार्दिक पांड्याला पाठवले माघारी

मुंबई इंडियन्स इथे गमावली सामन्यावरील पकड; डू प्लेसिसचे झेल ठरले टर्निंग पॉईंट

महेंद्रसिंग धोनीला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहून पत्नी साक्षीची रोमँटिक पोस्ट

दीपक चहरची अनोखी 'हॅटट्रिक'; IPLमध्ये असा पराक्रम कुणाला जमला नाही

IPLच्या 12 पर्वात जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं

 

Web Title: IPL 2020 MI vs CSK Latest News: Poor fielding hurts Mumbai Indians; Chennai Super Kings won by 5 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.