IPL 2020 : मयंती लँगरने सांगितले आयपीएल सोडण्याचे कारण  

आयपीएलची स्टार होस्ट मयंती लँगर हीने आता आयपीएल सोडण्याचे खरे कारण सांगितले आहे. मयंती हीने शनिवारी ट्विटरवर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 10:35 AM2020-09-20T10:35:04+5:302020-09-20T10:35:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Mayanti Langer gives reasons for leaving IPL | IPL 2020 : मयंती लँगरने सांगितले आयपीएल सोडण्याचे कारण  

IPL 2020 : मयंती लँगरने सांगितले आयपीएल सोडण्याचे कारण  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - आयपीएलची स्टार होस्ट मयंती लँगर हीने आता आयपीएल सोडण्याचे खरे कारण सांगितले आहे. मयंती आणि स्टुअर्ट बिन्नी या दाम्पत्याला सहा अठवडे आधी मुलगा झाला आहे. त्यामुळेच मयंती यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही. मयंती हीने शनिवारी ट्विटरवर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून यंदा आयपीएलमध्ये मयंती लँगर दिसणार नसल्याच्या चर्चा होत्या. त्याची पुष्टी देखील करण्यात आली होती. मात्र आता मयंतीनेच ट्विट करून खरे कारण काय, याची माहिती देखील दिली आहे.

मंयतीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला जेव्हा जास्त गरज होती. तेव्हा स्टार स्पोर्ट्सने मला माझ्या कुटुंबाप्रमाणे साथ दिली. त्यांनी माझ्यासाठी खुप बदल केले होते, असे म्हणत मयंतीने स्टार स्पोर्ट्सचे आभार देखील मानले आहेत. मंयती हिने या आधी देखील शुक्रवारी एक पोस्ट करत आपण आयपीएलचा  भाग नसणार,  यामध्ये कोणतेही वादग्रस्त कारण नसल्याचे स्पष्ट केले होते. आज तीने तिचा पती स्टुअर्ट बिन्नी आणि मुलगा यांच्यासोबतचा एक फोटो देखील ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

Web Title: IPL 2020: Mayanti Langer gives reasons for leaving IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.