लसिथ मलिंगा UAEत दाखल होणार? IPL 2020 त पुनरागमन करणार? जाणून घ्या सत्य

IPL 2020: सुपर ओव्हरमध्ये नवदीन सैनीनं ( Navdeep Saini) केलेल्या टिच्चून माऱ्यानं MIचा पराभव पक्का केला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 29, 2020 07:11 PM2020-09-29T19:11:26+5:302020-09-29T19:11:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Lasith Malinga Trends on Twitter After MI's Super Over Loss to RCB | लसिथ मलिंगा UAEत दाखल होणार? IPL 2020 त पुनरागमन करणार? जाणून घ्या सत्य

लसिथ मलिंगा UAEत दाखल होणार? IPL 2020 त पुनरागमन करणार? जाणून घ्या सत्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा झाला. मुंबई इंडियन्सनं ( MI) दमदार खेळ करताना 201 धावांपर्यंत मजल मारली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. सुपर ओव्हरमध्ये नवदीन सैनीनं ( Navdeep Saini) केलेल्या टिच्चून माऱ्यानं MIचा पराभव पक्का केला.  या पराभवानंतर सोशल मीडियावर लसिथ मलिंगा ( Lasith Malinga) याच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया सत्य...

प्रथम फलंदाजीला आलेल्या RCBनं आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांच्या अनुक्रमे 52, 54 आणि 55 धावांच्या जोरावर 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला. मुंबई इंडियन्सला सुरुवातीला बसलेल्या धक्क्यानंतर RCBचा विजय पक्का मानला जात होता. MIला अखेरच्या पाच षटकांत म्हणजेच 30 चेंडूत 90 धावा हव्या होत्या. इशान किशन ( Ishan Kishan) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी सामना खेचून आणला. इशान 58 चेंडूंत 2 चौकार व 9 षटकार खेचून 99 धावा केल्या, तर पोलार्डनं 24 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 60 धावा केल्या. पोलार्डला अखेरच्या चेंडूवर 5 ऐवजी चारच धावा करता आल्यानं MI ला 5 बाद 201 धावांवर समाधान मानावे लागले.  

MIच्या या पराभवानंतर #LasithMalinga हा ट्रेंड सुरू झाला. मलिंगानं वैयक्तिक कारणास्तव IPL2020 मधून माघार घेतली. मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे. त्यानं 19.80च्या सरासरीनं आणि 7.14च्या इकोनॉमीनं ही कामगिरी केली आहे. 2019चे जेतेपद जिंकून देण्यात मलिंगानं महत्त्वाचा वाटा उचलला होता. मुंबई इंडियन्सन त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे. त्यामुळे मलिंगाचे पुनरागमन अशक्य आहे.

MIच्या सुपर ओव्हरमधील पराभवानंतर सुपर ओव्हर स्पेशालिस्ट मलिंगाच्या कमबॅकची मागणी चाहत्यांकडून होत आहे. MIला सुपर ओव्हरमध्ये 7 धावांचा बचाव करता आला नाही. जसप्रीत बुमराहच्या त्या षटकात RCBनं विजय मिळवला 


 

Web Title: IPL 2020: Lasith Malinga Trends on Twitter After MI's Super Over Loss to RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.