IPL 2020 : आयपीएलमध्ये 'ह्यांचे' हुकलेय फक्त एका धावेने शतक

- ललित झांबरे आयपीएल 2020 ( IPL 2020 ). मध्ये सलग दुसऱ्या दिवशी चित्तथरारक सामना बघायला मिळाला. रविवारी राहुल ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 03:57 PM2020-09-29T15:57:34+5:302020-09-29T16:00:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: In the IPL, 'their' hooklaya century with just one run | IPL 2020 : आयपीएलमध्ये 'ह्यांचे' हुकलेय फक्त एका धावेने शतक

IPL 2020 : आयपीएलमध्ये 'ह्यांचे' हुकलेय फक्त एका धावेने शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- ललित झांबरे

आयपीएल 2020 (IPL 2020). मध्ये सलग दुसऱ्या दिवशी चित्तथरारक सामना बघायला मिळाला. रविवारी राहुल तेवटियाने सामन्याला कलाटणी दिली तर सोमवारी किरेन पोलार्ड (Kieron Pollard) व इशान किशन ( Ishan Kishan)  यांनी राॕयल चॕलेंजर्सच्या (Royal Challengers Bangalore) तोंडचे पाणी पळवले. सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचवला मात्र एवढे जीवतोड प्रयत्न  करुनही मुंबईचा (Mumbai Indians) तरुण फलंदाज इशान किशनच्या पदरी दुहेरी निराशा पडाली. एकतर मुंबईने 'टाय' सामना सुपर ओव्हरच्या (Super Over) शेवटच्या चेंडूवर गमावला आणि दुसरे म्हणजे स्वतः इशानचे शतक फक्त एका धावेने हुकले.

मुंबईला विजयासाठी दोन चेंडूत पाच धावा हव्या असताना आणि स्वतः 99 धावांवर असताना तो बाद झाला. उदानाचा चेंडू स्वीप करताना त्याने मिडविकेटच्या जागी झेल दिला. 58 चेंडूंच्या खेळीत त्याने दोन चौकार आणि नऊ षटकार लगावले. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सतर्फे त्याचा हा पहिलाच सामना होता. 

केवळ एका धावेने शतक हुकल्याने तो विराट कोहली, ख्रिस गेल, सुरेश रैना आणि पृथ्वी शाॕ यांच्या पंक्तीत जाऊन बसला. हे चौघेही एकतर 99 धावांवर नाबाद राहिलेत किंवा बाद झाले आहेत. सुरेश रैना व ख्रिस गेल हे दोघे 99 धावांवर नाबाद परतले आहेत. 

सुरेश रैना हा तर आयपीएलच्या इतिहासातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण खेळाडू आहे कारण आयपीएलमध्ये 98, 99 आणि 100 धावांच्या खेळी त्याच्या नावावर आहेत तर ख्रीस गेल व आता इशान किशन यांच्या 99 धावांच्या खेळी या पराभवात आहेत. इशानप्रमाणेच पृथ्वी शाॕच्या खेळीचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.

सुरेश रैना (सीएसके) - नाबाद 99 

वि. सनरायजर्स, हैदराबाद 2013

या खेळीत रैनाला शतकासाठी पाच धावांची गरज होती आणि सामन्यातील एकच चेंडू शिल्लक होता. तोवर त्याने 11 चौकार आणि तीन षटकार लगावलेले होते. मात्र शेवटच्या चेंडूवर तो फक्त चौकारच मारु शकला आणि 52 चेंडूत त्याला 99 धावांवर नाबाद परतावे लागले. 

विराट कोहली (आरसीबी) - 99

वि. दिल्ली डेअरडेविल्स, 2013

रैनाच्या खेळीनंतर दोनच दिवसात ही खेळी आली. 16 व्या षटकाअखेर विराट 43 चेंडूत 47 धावा काढून खेळत होता. मात्र पुढच्या 15 चेंडूतच त्याने आणखी 52 धावा जमवल्या. डावातील शेवटच्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या असत्या तर शतक झाले असते पण दुसरी धाव घेताना तो धावबाद झाला. मात्र आरसीबीने हा सामना जिंकला होता. 

ख्रिस गेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) - नाबाद 99

वि. राॕयल चॕलेंजर्स, 2019

टी-20 च्या फलंदाजीच्या विक्रमांमध्ये ख्रिस गेलचे नाव असणार नाही असे दुर्मिळच...आरसीबी कडून मोकळे झाल्यावर किंग्ज इलेव्हनसाठी आपल्या आधीच्याच संघाविरुध्द त्याने ही खेळी केली. डावातील दोन चेंडू शिल्लक असताना गेल 95 धावांवर होता पण मोहम्मद सिराजचा पुढचा चेंडू त्याला चकवुन गेला तर शेवटच्या चेंडूवर त्याने चौकार मारला पण शतक फळ्यावर लागण्यासाठी तो पुरेसा नव्हता. जखमेवर मीठ म्हणजे गेलच्या संघाने हा सामनासुध्दा गमावला. 

पृथ्वी शॉ (दिल्ली कॕपिटल्स)- 99

वि. कोलकाता नाईट रायडर्स, 2019

शतक एका धावेने हुकले पण डावातील शेवटच्या षटकाआधी बाद झालेला हा एकमेव फलंदाज. पृथ्वीने 55 चेंडूतच 12 चौकार व तीन षटकारांसह 99 धावांची खेळी केली. 19 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याला लाॕकी फार्ग्युसनने बाद केले होते. त्यावेळी दिल्लीला विजयासाठी 12 धावांची गरज होती आणि पृथ्वी बाद होताच दिल्लीचा डाव गडगडला. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला पण दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. 

इशान किशन (मुंबई इंडियन्स)- 99

वि. राॕयल चॕलेंजर्स, दुबई, 2020

मुंबईला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी 53 धावांची गरज होती त्यावेळी इशान किशन 48 चेंडूत 70 धावांवर खेळत होता. त्यानंतर 4 चेंडूत 17 धावा असे समीकरण असताना इशान किशनने उदानाला लागोपाठ दोन षटकार लगावले आणि समीकरण दोन चेंडूत 5 धावा असे बदलवले शिवाय तो स्वतःसुध्दा 57 चेंडूत 99 धावांवर पोहोचला होता.  अशा वेळी उदानाचा आॕफस्टंप बाहेरील काहीसा संथ आलेला चेंडू इशानने गुडघ्यावर बसत स्वीप करायचा प्रयत्न केला पण चेंडू थेट मीडविकेटला पड्डिकलच्या हातात गेला. त्यामुळे मुंबईसाठी पहिल्याच सामन्यात शतकाचा त्याचा विक्रम हुकला पण पुढच्या चेंडूवर पोलार्डने चौकार मारुन सामना टाय केला खरा..पण सुपर ओव्हरमध्ये नवदीप सैनीने मुबईच्या पोलार्ड व पंड्याला फक्त सातच धावा करु दिल्या आणि शतक हुकलेल्या इशान किशनला आपल्या संघाच्या पराभवाचे दुःख सुध्दा पचवावे लागले.

Web Title: IPL 2020: In the IPL, 'their' hooklaya century with just one run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020