IPL 2020: Goa's Swapnil Asnodkar record maintained even after 12 years! | IPL 2020 : १२ वर्षांनंतरही गोव्याच्या स्वप्नीलचा विक्रम कायम!

IPL 2020 : १२ वर्षांनंतरही गोव्याच्या स्वप्नीलचा विक्रम कायम!

- सचिन कोरडे 
गोव्याचा ‘सचिन तेंडुलकर’म्हणून संबोधल्या जाणाऱ्याया स्वप्नील अस्नोडकर या माजी क्रिकेटपटूचा आयपीएलमधील एक विक्रम अजूनही अबाधित आहे. स्वप्नीलने २००८ मध्ये आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते. पदापर्णाच्या सामन्यातच स्वप्नीलने ६० धावांची आक्रमक खेळी केली होती. यंदाच्या सत्रात आरसीबीच्या देवदत्त पड्डीकलने पदापर्णात ५५ धावा कुटल्या. अशी कामगिरी करणार हा दुसरा फलंदाज ठरला. त्यामुळे १२ वर्षांनंतरही स्वप्नीलचा पदापर्णातील सर्वाधिक धावांचा विक्रम कायम आहे. स्वप्नीलने स्वत: या आठवणींना उजाळा दिला. त्याने समाजमाध्यमावर ही आठवण करुन दिली. त्यावर गोमंतकीय क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. चाहते त्याचे अभिनंदन करीत आहेत.  ( Live Score & Updates )

Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

 महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?  

स्वप्नील अस्नोडकर सध्या गोवा क्रिकेट संघटनेत प्रशिक्षक म्हणून आहे. १९ वर्षांखालील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली. त्याच्या अचानक निवृत्तीने गोमंतकीय क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. रणजी क्रिकेट स्पर्धेत गोव्याकडून सर्वाधिक धावा नोंदवण्याचा विक्रम स्वप्नीलच्या नावावर आहे.त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८८ सामन्यांत ४०.३ च्या सरासरीने ५,८८३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २५४ धावांच्या नाबाद खेळीचा समावेश आहे. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्स संघात ग्रेमी स्मिथसह तो संघाची सुरुवात करीत होता. (Live Score & Updates  )

पदापर्णाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या स्वप्नीलने अवघ्या ३४ चेंडूंत ६० धावा केल्या होत्या. हा स्ट्राईक १७६.४७ इतका होता. या खेळीत १० चौकारही होते. २००८ मध्ये त्याला भारताचा उदयोन्मुख खेळाडूचा बहुमानही मिळाला आहे. (Live Score & Updates  )

आयपीएलमध्ये पदापर्णातील सर्वाधिक धावा करणारे
१) स्वप्नील अस्नोडकर (राजस्थान रॉयल्स) वि. २००८ (६० धावा)
२)देवदत्त पड्डीकल (आरसीबी) वि. सनरायझर्स हैदरबाद ( ५६)
३) अम्बाती रायडू (मुंबई इंडियन्स) वि. राजस्थान रॉयल्स (५५)
४) विद्युत श्रीरामक्रिश्नान (चेन्नई सुपर किंग्स) वि. दिल्ली कॅपिटल्स (५४) 

महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six 

महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी

Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020: Goa's Swapnil Asnodkar record maintained even after 12 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.