BCCI नं मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्ससह इतरांना दिलं मोठं सरप्राईज; IPL 2020 Prize Money बाबत निर्णय बदलला!

BCCIनं मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स यांच्यासह सर्व पुरस्कारविजेत्या खेळाडू व अन्य संघांना मोठं सरप्राईज दिलं. यापूर्वी बीसीसीआयनं IPL 2020 साठीच्या बक्षीस रकमेबाबतचा निर्णय बदलला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 02:15 PM2020-11-11T14:15:45+5:302020-11-11T14:53:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Full list of prize money: Here's the whopping amount Mumbai Indians, Delhi Capitals and others will take home | BCCI नं मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्ससह इतरांना दिलं मोठं सरप्राईज; IPL 2020 Prize Money बाबत निर्णय बदलला!

BCCI नं मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्ससह इतरांना दिलं मोठं सरप्राईज; IPL 2020 Prize Money बाबत निर्णय बदलला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे जेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये जेतेपद पटकावले होते. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेताना DCला २० षटकांत ७ बाद १५६ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अर्धशतकाच्या जोरावर MIनं सहज बाजी मारली.

कोरोना व्हायरसच्या संकटात आयपीएल होणार की नाही, याबाबत साशंकता होती. पण, बीसीसीआयनं हे आव्हान पेललं आणि UAEत IPL 2020चं यशस्वी आयोजन कून दाखवलं. १० वर्षात पहिल्यांदाच बीसीसीआयला संपूर्ण आयपीएल परदेशात खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता आयपीएलनंतर बीसीसीआयनं भारतात स्थानिक क्रिकेट सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता तर बीसीसीआयनं IPL 2021साठी प्रयत्न सुरु केले आहेत. एप्रिल-मे महिन्यात IPL 2021 भारतातच घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. कोरोना परिस्थिती न सुधारल्यास UAEचा पर्याय बीसीसीआयनं ठेवला आहे. मुंबई इंडियन्सनं गाजवले निर्विवाद वर्चस्व!; त्यांच्या यशामागचं नेमकं समिकरण काय?

IPL 2020पूर्वी बीसीसीआयनं बक्षीस रक्कम ५०% कमी करण्याचा निर्णय घेतला होता. २०१९मध्ये मुंबई इंडियन्सनं ( MI) जेतेपद पटकावलं होतं आणि त्यांना २० कोटी बक्षीस रक्कम मिळाली होती, परंतु यंदाच्या विजेत्याला १० कोटी, उपविजेत्याला १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटी आणि क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी 4.375 कोटी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यंदा फ्रँचायझींना आर्थिक फटका बसणार होता. पण, मंगळवारी बीसीसीआयनं हा निर्णय बदलताना सर्वांना मोठं सरप्राईज दिलं.

बीसीसीआयनं मागील वर्षी बक्षीस रक्कम म्हणून ३२.५ कोटी खर्च केले होते. त्यानुसार विजेत्या संघाला २० व उपविजेत्याला १२.५ कोटी दिले होते. तेवढीच रक्कम बीसीसीआयनं यंदा दिली. 

संपूर्ण यादी (  Full list of prize money) 
- मुंबई इंडियन्स ( विजेता) - २० कोटी
- दिल्ली कॅपिटल्स ( उपविजेता) - १२.५ कोटी
- सनरायझर्स हैदराबाद ( प्ले ऑफ) - ८.७८ कोटी
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( प्ले ऑफ) - ८.७८ कोटी
- ट्रेंट बोल्ट ( फायनलमधील मॅन ऑफ दी मॅच) - ५ लाख
- लोकेश राहुल ( ऑरेंज कॅप) - १० लाख
- कागिसो रबाडा ( पर्पल कॅप) -१० लाख
- देवदत्त पडीक्कल ( Emerging Player) - १० लाख
- जोफ्रा आर्चर ( Most Valuable Player) - १० लाख
- किरॉन पोलार्ड ( Super Striker ) - १० लाख
- लोकेश राहुल ( Game Changer) - १० लाख
- ट्रेंट बोल्ट ( Power  Player) - १० लाख
- इशान किशन ( Sixes Of Season) - १० लाख\

Web Title: IPL 2020 : Full list of prize money: Here's the whopping amount Mumbai Indians, Delhi Capitals and others will take home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.