IPL 2020: लढत चांगली झाली, पण शेवटी दोन गुणांना महत्त्व असते - महेंद्रसिंग धोनी

CSK vs SRH Match News: सामने जिंकले तर गुणतालिकेतील स्थानही सुधारेल. सध्या गुणतालिकेचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही, पण कामगिरीत सुधारणा कशी करता येईल, याबाबत विचार करू.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 01:53 AM2020-10-15T01:53:00+5:302020-10-15T06:49:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: The fight went well, but in the end two points are important - MS Dhoni | IPL 2020: लढत चांगली झाली, पण शेवटी दोन गुणांना महत्त्व असते - महेंद्रसिंग धोनी

IPL 2020: लढत चांगली झाली, पण शेवटी दोन गुणांना महत्त्व असते - महेंद्रसिंग धोनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्ध २० धावांनी विजय मिळविल्यानंतर आपल्या खेळाडूंची प्रशंसा करताना म्हटले की, लढत चांगली झाली, पण शेवटी दोन गुणांना महत्त्व असते.
चेन्नईच्या प्रत्येक खेळाडूने योगदान दिले. त्यामुळे मंगळवारी सनरायजर्सविरुद्ध त्यांना १६७ धावांच्या लक्ष्याचा बचाव करता आला. धोनी म्हणाला,‘तुम्हाला दोन गुण मिळले हे अधिक महत्त्वाचे असते. आम्हाला आणखी सुधारणा करण्यास वाव आहे, पण एकूण विचार करता लढत चांगली झाली. सामने जिंकले तर गुणतालिकेतील स्थानही सुधारेल. सध्या गुणतालिकेचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही, पण कामगिरीत सुधारणा कशी करता येईल, याबाबत विचार करू.

संघात बदल आवश्यक होता
दुबई : पहिल्या सातपैकी पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे संघात बदल करणे आवश्यक होते. केलेला बदल अखेर उपयुक्त ठरला आणि विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपरकिंंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी व्यक्त केली.

‘खेळपट्टी संथ होती. लक्ष्याचा पाठलाग करताना लय गमावली. अतिरिक्त फलंदाज न खेळविणे आमची चूक होती, पण क्रिकेटमध्ये असे घडते. प्रत्येक सामना तुम्ही जिंकू शकत नाही.’ डेव्हिड वॉर्नर, कर्णधार सनरायजर्स हैदराबाद

Web Title: IPL 2020: The fight went well, but in the end two points are important - MS Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.