IPL 2020: दिल्ली पहिल्यांदाच अंतिम फेरीत; जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सविरुद्ध भिडणार

स्टोईनिस, रबाडा चमकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:55 AM2020-11-09T01:55:27+5:302020-11-09T06:56:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Delhi reach final for first time; Mumbai Indians will fight for the title | IPL 2020: दिल्ली पहिल्यांदाच अंतिम फेरीत; जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सविरुद्ध भिडणार

IPL 2020: दिल्ली पहिल्यांदाच अंतिम फेरीत; जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सविरुद्ध भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबुधाबी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघाला विजयी मार्गावर आणल्यानंतर केन विलियम्सन मोक्याच्यावेळी बाद झाला आणि येथून मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखताना दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा १७ धावांनी पराभव केला. या रोमांचक विजयासह दिल्लीने स्पर्धा इतिहसात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. आता मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात दिल्लीकरांना मुंबई इंडियन्सच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

आतापर्यंत दिल्ली वगळता प्रत्येक संघाने किमान एकदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १८९ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर दिल्लीने हैदराबादला ८ बाद १७२ धावांवर रोखले.

धावांचा पाठलाग करताना हैदराबादची ४ बाद ९० अशी अवस्था झाली, मात्र विलियम्सनने ४५ चेंडूंत ६७ धावांची तुफानी खेळी करत दिल्लीवर कमालीचे दडपण आणले. १७व्या षटकात मार्कस स्टोईनिसने विलियम्सला बाद केले आणि येथून हैदराबादने २१ धावांत ४ बळी गमावत सामनाही गमावला. अब्दुल समदनेही १६ चेंडूंत ३३ धावांची झुंजार खेळी केली.  स्टोईनिसने विलियम्सनसह प्रियम गर्ग आणि मनीष पांडे या आघाडीच्या फलंदाजाना बाद केले. तसेच कागिसो रबाडाने अखेरच्या डेथ ओव्हर्समध्ये भेदक मारा करताना २९ धावांत ४ बळी घेत हैदराबादचे कंबरडे मोडले.

त्याआधी, सलामीवीर शिखर धवन व शिमरॉन हेटमायर यांच्या जोरावर दिल्लीने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या पृथ्वी शॉला संघाबाहेर बसवल्यानंतर मार्कस स्टोईनिस धवनसह सलामीला आला. दिल्लीची ही चाल यशस्वी ठरली. तिसऱ्याच षटकात मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत स्टोईनिसने दिल्लीला वेगवान सुरुवात करुन दिली. स्टोईनिसने २७ चेंडूंत ३८ धावा केल्या. धवनने ५० चेंडूंत ७८ धावा चोपल्या. दोघांनी ८६ धावांची सलामी दिली.

स्टोईनिस बाद झाल्यानंतर धवनने सूत्रे सांभाळली. कर्णधार श्रेयस अय्यरने २० चेंडूंत २१ धावांची संथ खेळी खेळली, मात्र दुसºया बाजूने धवनचा दांडपट्टा सुरु होता. अय्यर परतल्यानंतर शिमरॉन हेटमायरने केवळ २२ चेंडूंत नाबाद ४२ धावांचा तडाखा दिला. हैदराबादकडून जेसन होल्डर, राशिद खान व संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

सामन्यातील विक्रम-

आयपीएलच्या एका सत्रात मधल्या षटकांमध्ये (७ ते १५षटके) सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये राशिद खानने १९ बळींसह तिसरे स्थान पटकावले. पहिल्या दोन स्थानी अनुक्रमे इम्रान ताहीर (२४) आणि हरभजन सिंग (१९) आहेत.
फलंदाज म्हणून यंदाचे सत्र शिखर धवनसाठी सर्वोत्तम ठरले. त्याने ५६९ धावांची आपली सर्वोत्तम कामगिरी मागे टाकत यंदा एकूण ६०३ धावा फटकावल्या.
यंदाच्या सत्रात ६०० हून अधिक धावा फटकावणारा धवन, लोकेश राहुलनंतरचा दुसरा फलंदाज ठरला.
धवनने आयपीएलच्या एका सत्रात पहिल्यांदाच ६०० धावांचा पल्ला पार केला. 

Web Title: IPL 2020: Delhi reach final for first time; Mumbai Indians will fight for the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.