IPL 2020: IPLचे सामने होणार नाहीत; 'या' राज्याने दिला BCCIला धक्का

देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून अनेक उपाय अवलंबण्यात येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 01:22 PM2020-03-13T13:22:15+5:302020-03-13T13:34:18+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Delhi govt bans sporting activities which attract large gatherings including IPL mac | IPL 2020: IPLचे सामने होणार नाहीत; 'या' राज्याने दिला BCCIला धक्का

IPL 2020: IPLचे सामने होणार नाहीत; 'या' राज्याने दिला BCCIला धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे संकट आता भारतात येऊन घडकले आहे. देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून अनेक उपाय अवलंबण्यात येत आहेत. कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचं संकट ओढावलं आहे. तसेच  भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएललाही कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएलचे सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनाविषयी अद्याप मौन पाळले आहे. परंतु दिल्लीमध्ये आयपीएलचा एकही सामना न खेळवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने घेतला आहे.

दिल्लीचे उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पत्रकार परिषदेत म्हणाले की, कोरोनामुळे दिल्लीतदिल्लीत एकही आयपीएलचे सामने खेळवणार नाही. तसेच दिल्लीतील क्रीडा विश्वाशी संबंधित सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी राज्यात होणाऱ्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण दिल्लीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिले आहे.

 

१५ एप्रिलपर्यंत विदेशी खेळाडूंवर निर्बंध

व्हिसा बंदीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत. आयपीएल रिकाम्या स्टेडियममध्ये करण्याची शक्यता असली तरी ही लीग रद्द होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्याा सामन्यात जवळपास ६० विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, आयपीएलमध्ये खेळणारे विदेशी खेळाडू बिझनेस व्हिसा श्रेणीत मोडतात. सरकारच्या निर्देशानुसार त्यांना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आधीच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या स्थानिक सामन्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: IPL 2020: Delhi govt bans sporting activities which attract large gatherings including IPL mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.