VIDEO: युवा खेळाडूची एक चूक अन् वैतागला कूल केन विल्यमसन

IPL 2020 CSK vs SRH: प्रियम गर्गच्या चुकीमुळे केन विल्यमसन स्वस्तात माघारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 09:56 PM2020-10-02T21:56:40+5:302020-10-02T22:02:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 CSK vs SRH captain kane williamson loses his cool after run out | VIDEO: युवा खेळाडूची एक चूक अन् वैतागला कूल केन विल्यमसन

VIDEO: युवा खेळाडूची एक चूक अन् वैतागला कूल केन विल्यमसन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलचा फिव्हर प्रत्येक सामन्यागणीक  वाढतोय. एरव्ही कुल कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा केन विल्यम्सन, ज्याने विश्वचषकातील पराभव देखील सहजतेने स्मित हास्य करत पचवला. तोच विल्यमसन आजच्या सामन्यात चांगलाच वैतागला होता. सनरायजर्सकडून खेळणाºया विल्यमसन आजच्या चेन्नई विरोधातील सामन्यात प्रियम गर्गच्या चुकीमुळे धावबाद झाला. त्यामुळे केन विल्यमसन वैतागला होता.

विल्यमसनच्या हावभावांमुळे ट्विटरवर त्याच्या नावाने ट्रेंडही सुरू झाला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारल्यानंतरही विल्यमसनने
हा पराभव स्मित हास्य करतच स्विकारला होता. मात्र आजच्या सामन्यात बाद झाल्यावर तो काहीसा हताश दिसला. विल्यमसन बाद झाल्यावर प्रियम गर्ग याने २६ चेंडूत ५१ धावा कुटल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्या या शानदार खेळीमुळेच सनरायजर्सने २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या.

पाहा कसा झाला केन विल्यमसन-https://www.iplt20.com/video/211212/caught-unawares-msd-does-the-rest

विल्यमसन बाद झाल्यावर गर्ग हा  दबावात होता. कारण त्यावेळी संघाचा डाव सावरु शकेल असा एकमेव खेळाडू केनच होता. मात्र या दबावात देखील गर्ग याने शानदार खेळी करत आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक ठोकले. अभिषेक शर्मा (२४ चेंडूत ३१ धावा) याने देखील त्याला चांगली साथ दिली.

Web Title: IPL 2020 CSK vs SRH captain kane williamson loses his cool after run out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.