IPL 2020 : CSKच्या नावावर नकोशी कामगिरी; चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी!

सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) संघानं यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. अन् चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका

By स्वदेश घाणेकर | Published: September 30, 2020 06:01 PM2020-09-30T18:01:01+5:302020-09-30T18:01:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: CSK makes ‘unwanted record’, drops to 8th in the points table for the first time in IPL history | IPL 2020 : CSKच्या नावावर नकोशी कामगिरी; चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी!

IPL 2020 : CSKच्या नावावर नकोशी कामगिरी; चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) हे आघाडीवर आहेत. मुंबईने सर्वाधिक चार, तर चेन्नईने 3 जेतेपद पटकावली आहे. पण, IPLच्या 13वर्षांच्या मोसमात CSKवर न ओढावलेली नामुष्की यंदाच्या मोसमात ओढावली आहे. सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सची ( DC) विजयी घोडदौड रोखली. SRHनं 15 धावांनी DCला पराभूत करून IPL 2020मधील पहिला विजय नोंदवला.

सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) संघानं यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. डेव्हिड वॉर्नर ( David Warner), जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि केन विलियम्सन ( Kane Williamson ) यांनी दमदार खेळ करत संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर रशीद खान ( Rashid Khan) नं मॅच विनिंग गोलंदाजी केली. त्याला भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, अभिषेक वर्मा आणि टी नटराजन यांची सुरेख साथ लाभली.  

या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादनं IPL Points Table मध्ये सहाव्या स्थानावर झेप घेतली. त्यांनी कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स ( CSK) यांना अनुक्रमे 7 व्या व 8व्या स्थानी पाठवले. IPLच्या गुणतक्त्यात प्रथमच CSKला तळावर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.  


नेटिझन्सनी घेतली फिरकी.






 

Web Title: IPL 2020: CSK makes ‘unwanted record’, drops to 8th in the points table for the first time in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.