IPL 2020 : संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाबाबत अखेर चेन्नई सुपरकिंग्सने घेतला मोठा निर्णय?

चेन्नई सुपरकिंग्सला सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्यानंतर रैनाला संघात परत बोलावण्याची मागणी सीएसकेच्या चाहत्यांकडून होत होती. दरम्यान, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्सच्या फ्रँचायझीने सुरेश रैनाबाबत मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

By बाळकृष्ण परब | Published: September 29, 2020 12:20 PM2020-09-29T12:20:09+5:302020-09-29T12:38:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Chennai Super Kings finally take a big decision regarding Suresh Raina who is out of the team? | IPL 2020 : संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाबाबत अखेर चेन्नई सुपरकिंग्सने घेतला मोठा निर्णय?

IPL 2020 : संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाबाबत अखेर चेन्नई सुपरकिंग्सने घेतला मोठा निर्णय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजाह - डावखुरा फलंदाज सुरेश रैना हा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत नसला तरी चेन्नई सुपरकिंग्सच्या फ्रँचायझीसोबत सुरू असलेल्या शितयुद्धामुळे त्याचे नाव चर्चेत आहे. त्यातच चेन्नई सुपरकिंग्सला सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्यानंतर रैनाला संघात परत बोलावण्याची मागणी सीएसकेच्या चाहत्यांकडून होत होती. दरम्यान, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्सच्या फ्रँचायझीने सुरेश रैनाबाबत मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

काही वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेणाऱ्या सुरेश रैनाचे नाव यंदाच्या हंगामासाठीत संघात असलेल्या खेळाडूंच्या यादीमधून हटवण्याचा निर्णय चेन्नईच्या फ्रँचायझीने घेतला आहे. चेन्नई सुरकिंग्सच्या अधिकृत संकेतस्थळावरून रैनाचे नाव हटवण्यात आले आहे. त्यामुळे सुरेश रैना आता उर्वरित हंगामातही चेन्नईकडून खेळणार नाही हे निश्चित झाले होते.

भारतीय संघामधून बाहेर असलेला सुरेश रैना आयपीएलसाठी जोरदार तयारी करत होता. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या आठवडाभराच्या कॅम्पमध्येही तो सहभागी झाला होता. तसेच संघासोबत तो संयुक्त अरब अमिरातीमध्येही गेला होता. मात्र चेन्नईच्या संघातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रैनाने स्पर्धेतून माघार घेत भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र त्यानंतरही सुरेश रैनाने संघात परतण्याचा पर्याय खुला ठेवला होता. तसेच परिस्थिती सुधरल्यास मी चेन्नईच्या संघात परतण्याच असेन, असे रैनाने सांगितले होते. मात् त्याच्या पुनरागमानासाठी चेन्नईचे संघव्यवस्थापन तितकेसे इच्छूक नव्हते. अखेरीस संघाच्या अधिकृत संकेतस्थळावरील संघ सदस्यांच्या यादीतून रैनाचे नाव काढून यंदाच्या हंगामासाठी त्याच्या नावावर काट मारल्याचे संकेत चेन्नईच्या फ्रँचायझीने दिले आहेत. दरम्यान, सुरेश रैनाप्रमाणेच माघार घेणाऱ्या हरभजन सिंगचे नावही संघातील खेळाडूंच्या यादीतून हटवण्यात आले आहे.

सुरेश रैनाने चेन्नई सुपरकिंग्सला ट्विटरवर केले होते अनफॉलो

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबत यूएईमध्ये जाऊन नंतर वैयक्तिक कारण देत माघारी परतलेल्या सुरेश रैनाने आता ट्विटरवर चेन्नई सुपरकिंग्सला फॉलो करणे बंद केले होते. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्स आणि रैना यांच्यातील संबंध कधीही न सुधरण्याइतपत बिघडल्याचे संकेत मिळत होते. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी अगदी काही दिवस आधी सुरेश रैना मायदेशी परतला होता. त्याच्या या निर्णयामुळे चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन. श्रीनिवासन कमालीचे नाराज झाले होते.
त्यापूर्वी सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथ यांनी रैनाच्या पुनरागमनाबाबत मोठे विधान केले होते, सध्या आम्ही रैनाला परत बोलावण्याचा विचार करू शकत नाही. तो स्वत:च माघारी गेला होता. क्रिकेटमध्ये जीत हार होतच असते. पुढच्या सामन्यांमधून आम्ही नक्कीच पुनरागमन करू. सीएसकेच्या सीईओंचे हे विधान ऐकल्यानंतरच रैनाने सीएसकेला ट्विटरवर अनफॉलो केले जात असल्याचे सांगण्यात येत होते.

Web Title: IPL 2020: Chennai Super Kings finally take a big decision regarding Suresh Raina who is out of the team?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.