IPL 2020: फलंदाजांनी गाजवले वर्चस्व

भारतीय खेळाडूंसाठी हा आठवडा मिश्र यशाचा ठरला. रोहितने जबरदस्त फॉर्म दाखवला असून पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असूनही त्याने मुंबईला गुणतालिकेत अव्वल स्थानी नेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 05:45 AM2020-10-04T05:45:45+5:302020-10-04T05:46:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Batsman dominating over bowlers | IPL 2020: फलंदाजांनी गाजवले वर्चस्व

IPL 2020: फलंदाजांनी गाजवले वर्चस्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर

डेथ ओव्हर्समध्ये झालेली आणि तुफानी फटकेबाजी आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यातील महत्त्वाच्या चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रोहित, राहुल आणि सॅमसन या आघाडीच्या टॉप आॅर्डर्ससह पोलार्ड आणि हार्दिक या फिनिशर्सनी मैदानावर पाडलेला षटकारांचा पाऊस लक्षवेधी ठरला. राहुल तेवतियानेही एकाच षटकात ५ षटकार ठोकत राजस्थानला पंजाबविरुद्ध गमावलेला सामना जिंकून दिला. २२३ धावांच्या हिमालयाएवढे लक्ष्य त्याने सहजपणे अवाक्यात आणले. त्याच वेळी, वॉटसन, वॉर्नर, रसेल, बेयरस्टॉ, मॉर्गन आणि पंत यांच्यामध्येही उत्तुंग षटकार ठोकण्याची क्षमता असून अद्याप ते म्हणावे तसे फॉर्ममध्ये आलेले नाहीत.

भारतीय खेळाडूंसाठी हा आठवडा मिश्र यशाचा ठरला. रोहितने जबरदस्त फॉर्म दाखवला असून पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असूनही त्याने मुंबईला गुणतालिकेत अव्वल स्थानी नेले. आरसीबीने मुंबईविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने विजयी चौकार मारत संघाला विजयी केले. मात्र याआधी तीन डावांमध्ये तो सपशेल अपयशी ठरला.

Web Title: IPL 2020 Batsman dominating over bowlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020