IPL 2020:  Ajinkya Rahane, Trent Boult, Mayank Markande get IPL raises with pre-auction trades | IPL 2020: दिल्लीकर होताच अजिंक्य रहाणेला लागली लॉटरी; ट्रेडमध्ये झाला मालामाल
IPL 2020: दिल्लीकर होताच अजिंक्य रहाणेला लागली लॉटरी; ट्रेडमध्ये झाला मालामाल

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली. प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली आणि त्यात राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला. दिल्लीकर होणं अजिंक्यच्या फायद्याचे ठरले. 

IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी! 

IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

ट्रेडमध्ये अजिंक्य, ट्रेंट बोल्ट आणि मयांक मार्कंडे ही चर्चेची नावं राहिली. अजिंक्यसाठी दिल्लीनं 1.25 कोटी अतिरिक्त रक्कम मोजली. त्याच्यासाठी आता दिल्लीनं एकूण 5.25 कोटी रक्कम मोजली आहे. राजस्थान रॉयल्सनं 2018च्या लिलावात 4 कोटीत आपल्या चमूत घेतले होते. बोल्टला एक कोटी अधिक रक्कम मिळाली. मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी 3.2 कोटी मोजले. दिल्ली कॅपिटल्सने 2018मध्ये त्याला 2.2 कोटींत घेतले होते. यात मयांकनं सर्वाधिक भाव खाल्ला. त्याच्यासाठी राजस्थाननं 1.8 कोटी अधिक मोजले. 2018मध्ये त्याला मुंबईनं 20 लाखांत घेतले होते.

IPL 2020: पंजाब ठरणार 'किंग'; जाणून घ्या लिलावासाठी कोणाचा किती बजेट! 

आयपीएलमधल्या कोणत्या खेळाडूंना संघात ठेवले कायम, जाणून घ्या...

अजिंक्यसह दिल्ली संघात आता आर अश्विनही दिसणार आहे. दिल्लीनं अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 7.6 कोटींत घेतले. 2018मध्ये पंजाबनं त्याला याच किमतीत ताफ्यात दाखल केले होते. अश्विनसाठी दिल्लीनं पंजाबला जे सुचिथ याला दिले. राजस्थान रॉयल्सनं राहुल तेवाटीया ( 3 कोटी) आणि मयांक ( 2 कोटी) यांना एकूण पाच कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. या ट्रेडमध्ये मयांकला दोन वेळा ट्रेड करण्यात आले. 

बोल्ट, कुलकर्णी यांना संघात घेण्यामागे मुंबई इंडियन्सचा 'खास' प्लान!
मुंबई इंडियन्सनं ट्रेंट बोल्ट आणि धवल कुलकर्णी या दोन गोलंदाजांना ट्रेडमधून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं, यामागे मुंबई इंडियन्सची एक खास रणनीती असल्याचं संघाचा मेंटर झहीर खाननं सांगितलं. या दोघांना संघानं का घेतलं, याबाबत झहीर म्हणाला,''संघ संतुलित आहेत. सर्व अनुभवी खेळाडू आमच्याकडे आहेत. हार्दिक  पांड्या आणि जसप्रीत बुमराह दुखापतीशी झगडत आहेत. पाडंयावर नुकतीच शस्त्रक्रीया झालीय, बुमराहही पाठदुखीच्या त्रासाचा सामना करत आहे. त्यामुळे पुढील सत्रात आमच्यासमोर अनेक आव्हानं आहेत.  त्यामुळे आम्हाला गोलंदाजी विभागात ताकद वाढवण्याची गरज होती. कोणत्या संघानं कोणाला रिलीज केलंय याचाही अभ्यास सुरू केला आहे. त्यानुसार आयपीएल लिलावात आणखी काही खेळाडू घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'' 

Web Title: IPL 2020:  Ajinkya Rahane, Trent Boult, Mayank Markande get IPL raises with pre-auction trades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.