IPL 2019 : जेव्हा धोनी देतो युवा यष्टीरक्षकांना शिकवणी...

आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्यांदा देण्यात धोनीली काहीही वाटत नाही. अशीच एक गोष्ट धोनीच्या बाबतीत पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:04 PM2019-05-08T18:04:42+5:302019-05-08T18:11:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: When MS Dhoni gives training to young wicket-keepers ... | IPL 2019 : जेव्हा धोनी देतो युवा यष्टीरक्षकांना शिकवणी...

IPL 2019 : जेव्हा धोनी देतो युवा यष्टीरक्षकांना शिकवणी...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनी एका चाणाक्ष कर्णधार आणि निष्णात यष्टीरक्षक आहे. आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्यांदा देण्यात धोनीली काहीही वाटत नाही. अशीच एक गोष्ट धोनीच्या बाबतीत पाहायला मिळाली. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना झाल्यावर धोनीने युवा यष्टीरक्षकांना शिकवणी दिल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी पंजाबविरुद्धचा सामना चेन्नईला गमवावा लागला. सामना संपल्यावर लोकेश राहुल आणि निकोलस पुरन या दोन्ही युवा यष्टीरक्षकांनी धोनीला काही प्रश्न विचारले. धोनीनेही यावेळी आपला अनुभव त्यांच्याबरोबर शेअर केला. धोनीने फक्त आपला अनुभव सांगितला नाही तर त्यांना मैदानात प्रात्यक्षिकही करून दाखवले.

पंजाबचा शेवट गोड, चेन्नईचे क्वालिफायर वन मधील स्थान कायम

लोकेश राहुल ( 71) आणि ख्रिस गेल (28) यांच्या 108 धावांच्या सलामीनेच किंग्स इलेव्हन पंजाबचा विजय पक्का केला होता. मात्र, हरभजन सिंगने पंजाबला लागोपाठ तीन धक्के देत सामन्यात चुरस निर्माण केली. निकोलस पुरणचा झेल सोडणे चेन्नई सुपर किंग्सला महागात पडले आणि पंजाबने विजयासह आयपीएलचा निरोप घेतला. चेन्नईचे 171 धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले. पुरणने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थानावर कायम राहण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. पण, त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान पक्के केले आहे. 

चेन्नई सुपर किंग्सने फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला.  ड्यू प्लेसिसचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. सॅम कुरनच्या अप्रतिम यॉर्करने ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. ड्यू प्लेसिसने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 96 धावा केल्या.  रैना 38 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. पंजाबच्या कुरनने तीन, तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पंजाबला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण, चौकार षटकारांच्या आतषबाजीत गेलपेक्षा राहुल अधिक आक्रमक खेळ केला. लोकेशने 19 चेंडूंत अर्धशतक केले. आयपीएलमधील हे तिसरे जलद अर्धशतक ठरले. गेल आणि राहुल यांनी 12च्या सरासरीनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली.  या दोघांची 108 धावांची भागीदारी हरभजन सिंगने संपुष्टात आणली. भज्जीनं 11व्या षटकात राहुल व गेल यांना लागोपाठ माघारी पाठवले. भज्जीची हॅटट्रिक मात्र हुकली. राहुल 36 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकार खेचून 71 धावा करत माघारी परतला. गेलने 28 चेंडूंत 28 धावा केल्या. भज्जीनं पुढच्याच षटकात पंजाबला आणखी एक धक्का देत मयांक अग्रवालला माघारी पाठवले. ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर मुरली विजयने निकोलस पुरणचा सोपा झेल सोडला. त्याच पुरणने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. 

 मुंबईकडून पराभूत झाल्यावर भडकला धोनी
महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल म्हटले जाते. पण मंगळवारी धोनी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. या सामन्यानंतर धोनी संघावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यानंतर धोनी संघातील फलंदाजांवर चांगलाच भडकला होता. सामन्यानंतर धोनी म्हणाला की, " या सामन्यात काही गोष्टी आमच्या बाजूने घडल्या नाहीत. खासकरून आमची फलंदाजी चांगली झाली नाही. हा सामना आमच्या घरच्या मैदानात होता. यापूर्वी या मैदानात आम्ही बरेच सामने खेळले आहोत. त्यामुळे आम्हाला खेळपट्टी कशी आहे, हे माहिती होते. त्यामुळे फलंदाजांनी जर जास्त धावा केल्या असत्या तर ते आमच्या फायद्याचे ठरले असते. फलंदाजांनी चुकीचे फटके मारल्यामुळेच आमच्या जास्त धावा होऊ शकल्या नाहीत. "

धोनी पुढे म्हणाला की, " या संघातील खेळाडूंनीच आम्हाला विजय मिळवून दिले आहेत. पण मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यांना परिस्थितीचा योग्य अंदाच घेता आला नाही. जर फलंदाजांनी परिस्थिती चांगली हाताळली असती तर आमच्या जास्त धावा होू शकल्या असत्या."

Web Title: IPL 2019: When MS Dhoni gives training to young wicket-keepers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.