IPL 2019: Sunil Grover make joke on MS Dhoni and sakshi laugh, Video Viral | IPL 2019 : धोनीवर सुनील ग्रोवरने केलेला जोक ऐकून साक्षी खो-खो हसली, व्हिडीओ वायरल
IPL 2019 : धोनीवर सुनील ग्रोवरने केलेला जोक ऐकून साक्षी खो-खो हसली, व्हिडीओ वायरल

मुंबई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात एक मजेशिर किस्सा घडला. या सामन्यात विनोदवीर सुनील ग्रोवरने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर एक जोक केला आणि या जोकवर धोनीची पत्नी साक्षीला हसू आवरता आले नाही.

चेन्नई आणि पंजाब या दोन्ही संघांचा हा अखेरचा साखळी सामना होता. या साखळी सामन्यात पंजाबने चेन्नईवर विजय मिळवला. या सामन्यातील पराभवामुळे चेन्नईला गुणतालिकेत अव्वल स्थान गमवावे लागले होते.

या सामन्याच्यावेळी सुनील मजेशिर कॉमेंट्री करत होता. त्यावेळी साक्षी त्याच्या बाजूच्याच सीटवर बसलेली होती. त्यावेळी सुनील म्हणाला की, " धोनी हा एवढा महान क्रिकेटपटू आहे की, त्याची गाडीदेखील स्डेडियमच्या आतमध्ये पार्क केली जाते. " हे ऐकल्यावर साक्षीला हसू आवरता आले नाही.
हा पाहा व्हिडीओ


Web Title: IPL 2019: Sunil Grover make joke on MS Dhoni and sakshi laugh, Video Viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.