IPL 2019 : दिल तो बच्चा हैं जी... धोनीने केली मस्ती, पाहा हा व्हिडीओ

खेळाडूंच्या लहानग्यांबरोबर धोनी मस्ती करत असल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 05:08 PM2019-04-07T17:08:16+5:302019-04-07T17:09:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: See MS Dhoni's fun after the match | IPL 2019 : दिल तो बच्चा हैं जी... धोनीने केली मस्ती, पाहा हा व्हिडीओ

IPL 2019 : दिल तो बच्चा हैं जी... धोनीने केली मस्ती, पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019: महेंद्रसिंग धोनी, हे नावच साऱ्यांसाठी पुरेसं आहे. कारण हाच धोनी अनहोनी को होनी, करणारा आहे. पण मैदानात मात्र धोनी शांत असतो. मैदानात आपल्या भावनांना तो वाट मोकळी करून देत नाही. पण शनिवारी चेन्नई सुपर किंग्सचाकिंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर सामना होता. हा सामना चेन्नईने जिंकला. या सामन्यानंतर धोनीने मैदानात चक्क मस्ती केल्याचे पाहायला मिळाले.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तिनवेळा जेतेपद पटकावले आहे. धोनी ज्या खेळाडूंच्या सहवासात येतो त्यांच्या खेळात सकारात्मक बदल झाल्याचे पाहायला मिळते. मैदानात तो जेवढा गंभीर असतो, तेवढाच मैदानाबाहेर तो खेळाडूंबरोबर मस्ती करत असतो. पण यावेळी धोनीने खेळाडूंबरोबर मस्ती केली नाही, तर खेळाडूंच्या लहानग्यांबरोबर धोनी मस्ती करत असल्याचे पाहायला मिळाले.

पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नईचे खेळाडू आणि त्यांची मुलं मैदानात होती. त्यावेळी शेन वॉटसन आणि इम्रान ताहिर यांची मुलं धमाल करत होती. या दोघांमध्ये धावण्याची शर्यत सुरु होणार होती. यावेळी धोनी त्यांच्या मागून आला आणि त्यांच्या आधीच धावत पुढे गेला. त्यानंतर या तिघांमध्ये धावण्याची शर्यत रंगली. या शर्यतीमध्ये वॉटसनचा मुलगा पुढे निघून गेला. त्यावेळी धोनीने ताहिरच्या मुलाला उचलून घेतले आणि ही शर्यत पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा खास व्हिडीओ


क्रिकेट नव्हे, तर धोनी आपल्या मुलीला देतोय या खेळाचे धडे
गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने पहिले दोन सामने जिंकत आयपीएलमधील आपल्या अभियानाची दणक्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, संघाची कामगिरी चांगली होत असल्याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीही निश्चिंत असून, धोनी आणि त्याच्या मुलीचे एक छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आपल्या मुलीला एक खेळ शिकवत आहे. पण हा खेळ क्रिकेट नाही बरं का. तर धोनी आपल्या मुलीला सध्या कॅरम शिकवत आहे. त्याचे हे छायाचित्र चेन्नईच्या आयपीएल इन्स्टाग्राम पेजवरही शेअर करण्यात आला आहे. 
 
या छायाचित्रामध्ये धोनी त्याची मुलगी झिवासोबत कॅरम खेळताना दिसत आहे. त्यात एकीकडे धोनी बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला झिवा बसली आहे. तसेच दोघेही स्ट्रायकरच्या मदतीने निशाणा लावताना दिसत आहे.

धोनी आणि झिवाचा व्हायरल झालेले हे काही पहिलेच छायाचित्र नाही. हल्लीच धोनी झिवासोबत विविध भाषांमध्ये बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायर झाला होता. हा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत होता.  त्याशिवाय धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेरअ केला आहे. ज्यात तो आपली मुलगी झिवासोबत बीचवर मस्ती करताना दिसत आहे.

Web Title: IPL 2019: See MS Dhoni's fun after the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.