IPL 2019 RCB vs KKR live update : आंद्रे रसेलचा तुफानी खेळ, बंगळुरू संघाचा 'विराट' पराभव | IPL 2019 RCB vs KKR live update : आंद्रे रसेलचा तुफानी खेळ, बंगळुरू संघाचा 'विराट' पराभव
IPL 2019 RCB vs KKR live update : आंद्रे रसेलचा तुफानी खेळ, बंगळुरू संघाचा 'विराट' पराभव

बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी सलग चार सामन्यांत झालेल्या पराभवाचा राग कोलकाता नाइट रायडर्सवर काढला. इंडियन प्रीमिअर लीगच्या या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार विराट कोहलीनं विक्रमांचे डोंगर उभे केले. त्याला पार्थिव पटेल व एबी डिव्हिलियर्स यांची उत्तम साथ लाभली. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 205 धावा केल्या. आंद्रे रसेलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 5 चेंडू आणि 5 गडी राखून हा सामना जिंकला.

LIVE

Get Latest Updates

11:43 PM

आंद्रे रसेलची तुफान फटकेबाजी, 13 चेंडूत 48 धावांची खेळी

आंद्रे सरेलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने बंगळुरूच्या संघाचा विराट पराभव केला. कोलकाताने 5 चेंडू आणि 5 गडी राखून बंगळुरुवर विजय मिळवला. तर, या पराभवासह विराटसंघाला पाचव्यांदा हार पत्कारावी लागली आहे.   

11:27 PM

दिनेश कार्तिकचा सीमारेषेवर टिपला झेल

दिनेश कार्तीक झेलबाद, 9 चेंडूत 19 धावा काढून तंबूत. कोलकाताचा संघ अडचणीत. 18 चेंडूत 53 धावांची गरज 

11:16 PM

कोलकाताकडून कार्तिकचा संयमी खेळ, राणा झेलबाद

कोलकाताकडून राणा आणि कार्तिक यांच्याकडून संयमी खेळी सुरु असतानाच राणा हा झेलबाद झाला आहे.   

10:53 PM

पवन नेगीनं पुन्हा एकदा कोलकाताला धक्का दिला. सलामीवीर ख्रिस लीनचा अडथळा दूर करताना त्यानं कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. लीनने 31 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावा केल्या. 

10:46 PM

मोहम्मद सिराजने 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लीनचा झेल सोडला. लीनला 42 धावांवर असताना मार्कस स्टोइनिसच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. 
 

10:42 PM

रॉबीन उथप्पा आणि ख्रिस लीन ही सेट जोडी बंगळुरूच्या पवन नेगीनं तोडली. दहाव्या षटकात त्यानं उथप्पाला झेलबाद करून माघारी पाठवले. उथप्पाने 25 चेंडूंत 6 चौकांरांसह 33 धावा केल्या.

10:18 PM

नरीन माघारी परतल्यानंतर लिन आणि रॉबीन उथप्पा यांनी कोलकाताचा डाव सावरला. दोघांनी दमदार खेळी करतान संघाला 5 षटकांत 51 धावांपर्यंत मजल मारून दिली.

10:14 PM 

10:11 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरीन आणि ख्रिस लीन यांनी कोलकाताला 28 धावांची सलामी दिली. लिनला एक जीवदानही मिळाल, परंतु नरीन 10 धावांवर माघारी परतला. मात्र, आयपीएलमध्ये त्याने 2000 धावांचा पल्ला पार केला.

09:25 PM

एबी डिव्हिलियर्सने 32 चेंडूंत 63 धावा केल्या. त्यात 5 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. 

09:18 PM

कुलदीप यादवने 18 व्या षटकात ही जोडी फोडली. 49 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा करणाऱ्या कोहलीला त्यानं बाद केले. 
 

09:15 PM

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोघांनी आघाडी मिळवली. कोहली व डिव्हिलियर्स यांच्यात 9 शतकी भागीदारी झाल्या आहेत. 

09:11 PM

डिव्हिलियर्सनेही 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 4 चौकार व 3 षटकार खेचले.  

09:06 PM

बंगळुरूने 15 षटकांत 1 बाद 142 धावा केल्या. 

09:05 PM

कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला. त्याने सुरेश रैनाचा 5086 धावांचा टप्पा ओलांडला. 

09:02 PM

कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीनंही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीनं आंद्रे रसेलच्या एका षटकात 16 धावा चोपून अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. डिव्हिलियर्सने दोन खणखणीत षटकार खेचले.

08:53 PM 

08:52 PM

बंगळुरूने 12.1 षटकांत शकती पल्ला पार केला. 

08:51 PM 

08:51 PM

आयपीएलमधील त्याचे हे 39वे अर्धशतक ठरले. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांत डेव्हिड वॉर्नर ( 42) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ गौतम गंभीर ( 36), सुरेश रैना ( 36) आणि रोहित शर्मा ( 35) यांचा क्रमांक येतो. 
 

08:47 PM

विराट कोहलीने 31 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कट शॉट मारून चौकार खेचला. त्याच्या या खेळीत 7 चौकारांचा समावेश आहे.

08:43 PM

रॉयल चॅलेेंजर्स बंगळुरूने दहा षटकांत 1 बाद 78 धावा केल्या. कोहली 47 धावांवर खेळत आहे. 

08:36 PM

नीतिश राणाने कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्याने पटेलला 25 धावांवर पायचीत केले. पटेलने 24 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या होत्या. 

08:28 PM

रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी विक्रमाला गवसणी घातली. कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 17 वी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला. 

08:25 PM

पॉवर प्लेमध्ये बंगळुरूने बिनबाद 53 धावा केल्या. त्यात कोहलीच्या 29 आणि पटेलच्या 24 धावांचा समावेश होता. 

08:09 PM

पियुष चावलाने दुसऱ्याच षटकात बंगळुरूच्या धावांवर लगाम लावताना केवळ सात धावा दिल्या. 

08:04 PM

पार्थिव पटेलने दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारताना आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. विराट कोहलीनेही अखेरच्या दोन चेंडूवर खणखणीत चौकार खेचले. बंगळुरूने पहिल्याच षटकात 13 धावा जोडल्या. 

07:50 PM

आयपीएलच्या 12व्या मोसमात एकही विजय न मिळवणारा बंगळुरू हा एकमेव संघ आहे. बंगळुरूला चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद संघांकडून दारूण पराभव पत्करावा लागला, तर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून त्यांनी हातचा सामना गमावला.  

IPL 2019 : RCB वरपाचव्यापराभवाचंसावट; KKRविरुद्धचीकामगिरीटेंशनवाढवणारीhttps://t.co/rnf5fiWbuU#IPL2019@IPL@RCBTweets@KKRiders#RCBvKKR

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) April 5, 2019 

07:46 PM

कोलकाता नाइट रायडर्स : सुनील नरीन, ख्रिस लिन, रॉबीन उथप्पा, नितीश राणा, दिनेश कार्तिक, शुबमन गिल, आंद्रे रसेल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन

07:42 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, मार्कस स्टोइनिस, मोईन अली, अक्षदीप नाथ, पवन नेगी, नवदीप सैनी, टीम साऊदी, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज

07:38 PM 

07:37 PM

सुनील नरीन संघात परतल्याने कोलकाता नाइट रायडर्सची बाजू भक्कम, बंगळुरू संघात दोन बदल. शिमरोन हेटमायर आणि उमेश यादव बाहेर, टीम साउदी व पवन नेगी संघात

07:36 PM 


Web Title: IPL 2019 RCB vs KKR live update : आंद्रे रसेलचा तुफानी खेळ, बंगळुरू संघाचा 'विराट' पराभव
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.