नवी दिल्ली, आयपीएल 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. हार्दिक आणि कृणाल या दोन्ही पंड्या बंधूंच्या फटकेबाजीमुळे मुंबईला दिल्लीपुढे 169 धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करण्याता दिल्लीचा संघ अपयशी ठरला. 

मुंबईने या सामन्यात दिल्लीवर 40 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, त्याचबरोबर दिल्लीला त्यांच्या मैदानात पराभूत केले.

मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी 49 धावांची सलामी दिली. पण तयानंतर शिखर धवनच्या रुपात दिल्लीला पहिला धक्का बसला. धवनने 22 चेंडूंत 35 धावा केल्या. धवन बाद झाल्यावर दिल्लीचा डाव गडगडला. त्यानंतर दिल्लीचे चार फलंदाज झटपट बाद झाले. पण ख्रिस मॉरिस आणि अक्षर पटेल यांनी दिल्लीचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण दिल्लीला सामना जिंकवून देण्यात ते अपयशी ठरले.


अखेरच्या षटकांमध्ये पंड्या बंधूंनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 168 धावा करता आल्या आणि दिल्लीला 169 धावांचे आव्हान देता आले. 


मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितने 22 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या, तर डीकॉकने 27 चेंडूंत 35 धावा केल्या. या दोघांनी सात षटकांमध्ये 57 धावांची सलामी दिली. पण हे दोघे बाद झाल्यावर मुंबईची धावगती थोडीशी कमी झाली. पण त्यानंतर कृणाल आणि हार्दिक या पंड्या बंधूंनी सावरले. 


या पीचमध्ये दडलंय काय, सचिन तेंडुलकरने केली खेळपट्टीची पाहणी
मुंबई इंडियन्सचा आजचा सामना होणार आहे तो दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स संघाचा सल्लागार आहे. पण आतापर्यंत सचिन कधीही खेळपट्टी पाहण्यासाठी आला नव्हता. पण फिरोझशाह कोटला मैदानातील खेळपट्टी पाहण्यासाठी सचिन आवर्जुन आला. त्यामुळे या दिल्लीच्या पीचमध्ये नेमकं दडलंय तरी काय, असा सवा चाहते उपस्थित करत होते.Web Title: IPL 2019: Mumbai win 'Delhi', get second position
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.