Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली | Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली
Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली

बंगळुरु, आयपीएल 2019 : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आणि सर्वश्रेष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात समोरासमोर असतील, त्यावेळी सर्वांची नजर या दोन खेळाडूंदरम्यान रंगणाऱ्या लढतीवर असेल. दोन्ही संघ यंदाचा आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. अशावेळी कोहली व रोहित यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी राहील. बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने चिंतेचा वातावरण होते, पण त्यातून सावरत तो आपली छाप सोडण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या उपस्थितीत मुंबई बंगळुरूच्या कमकुवत बाजूचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. 

11:53 PM

मुंबईचा बंगळुरुवर विजय

अखेरच्या चेंडूवर मुंबईने बंगळुरुवर सहा धावांनी विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर बंगळुरुला जिंकायला सात धावा हव्या होत्या, पण त्यांना एकच धावा घेता आली.

11:41 PM

बंगळुरुला पाचवा धक्का 

11:30 PM

हेटमायर आऊट 

11:08 PM

विराट कोहलीचे अर्धशतक हुकले

मोठा फटका मारण्याच्या नादात विराट कोहली 46 धावांवर बाद झाला. कोहलीला बुमराने बाऊन्सर टाकून आऊट केले. बंगळुरुसाठी हा मोठा धक्का ठरला.

10:58 PM

IPL 2019: विराट कोहलीवर रोहित शर्माच पडला भारी, जाणून घ्या...

http://www.lokmat.com/cricket/ipl-2019-rohit-sharma-won-more-matches-virat-kohli/

10:39 PM

पार्थिव पटेल आऊट

पार्थिव पटेलच्या रुपात बंगळुरुला दुसरा धक्का बसला. पार्थिव पटेलने 22 चेंडूंत 31 धावा केल्या.

10:29 PM

बंगळुरु पाच षटकांत 1 बाद 48

बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली. त्यामुळेच बंगळुरुला पहिल्या पाच षटकांमध्ये 1 बाद 48 अशी मजल मारता आली.

10:23 PM

मोईन अली आऊट

मोईन अलीच्या रुपात बंगळुरुला यावेळी पहिला धक्का बसला. अलीने सात चेंडूंमध्ये 13 धावा केल्या.

09:45 PM

मुंबईला आठवा धक्का 

09:32 PM

मॅक्लेघन आऊट, मुंबईला सातवा धक्का 

09:29 PM

मुंबईला सहावा धक्का, कृणाल पंड्या आऊट 

09:28 PM

पोलार्ड आऊट 

09:28 PM

मुंबईला चौथा धक्का 

09:07 PM

युवराज सिंग आऊट 

08:54 PM

मुंबईला मोठा धक्का, रोहित शर्माचे अर्धशतक हुकले

रोहित शर्माला बाद करत बंगळुरुने मुंबईला मोठा धक्का दिला. रोहितने 33 चेंडूंत 48 धावा केल्या.

08:33 PM

क्विंटन डी' कॉक आऊट

डी' कॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. डी' कॉकने 20 चेंडूंत 23 धावा केल्या.

08:29 PM

मुंबईचे अर्धशतक पूर्ण

रोहित शर्माने सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावला आणि मुंबई इंडियन्सचे अर्धशतक फलकावर झळकले. मुंबई 6 षटकांत बिनबाद 52

08:05 PM

रोहित शर्माची दणक्यात सुरुवात

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने संघाला दमदार सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्याच षटकात दोन चौकार लगावले.

07:42 PM

बुमरा फिट, दुसऱ्या सामन्यातही खेळणार

गेल्या सामन्यात दुखापत झाल्याने मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज या सामन्यात खेळणार नाही, असे वाटले होते. पण मुंबईने या सामन्यातही बुमराला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. 

07:38 PM

बंगळुरुने नाणेफेक जिंकली

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली. कोहलीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्याने मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.


Web Title: Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.