IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का | IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का
IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का

मुंबई, आयपीएल 2019 : या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर होणार असला तरी त्यांना मुंबईकर क्रिकेटपटूंशीच दोन हात करावे लागणार आहे. कारण दिल्लीच्या संघात कर्णधार श्रेयस अय्यर आणि  पृथ्वी शॉ हे दोन मुंबईचेच खेळाडू आहेत. पण पहिल्याच सामन्यात मुंबईचा संघ बाजी मारतो की दिल्लीचा, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. या सामन्यात साऱ्यांचे लक्ष लागून असेल ते युवराज सिंगवर.

LIVE

Get Latest Updates

11:56 PM

दिल्लीचा मुंबईवर ३७ धावांनी विजय


11:45 PM

युवराज सिंग आऊट

युवराजचे एकाकी झुंज देत ५३ धावांची खेळी साकारली. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

11:43 PM

युवराज सिंगचे अर्धशतक

मुंबईच्या संघात प्रवेश केलेल्या युवराज सिंगने चौकारासह अर्धशतक पूर्ण केले.

11:36 PM

मुंबईला सातला धक्का 

11:26 PM

कृणाल पंड्या आऊट

कृणाल पंड्याच्या रुपात मुंबईला सहावा धक्का बसला. कृणालने 15 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या.

11:09 PM

हार्दिक पंड्या शून्यावर बाद

पोलार्ड आऊट झाल्यावर दोन चेंडूंमध्येच हार्दिक पंड्याही आऊट झाला. पंड्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

11:07 PM

पोलार्ड आऊट, मुंबईला चौथा धक्का

किरॉन पोलार्डच्या रुपात मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. पोलार्डने १३ चेंडूंत २१ धावा केल्या.

10:43 PM

मुंबईला तिसरा धक्का 

10:35 PM

सूर्यकुमार यादव आऊट 

10:26 PM

रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का 

09:44 PM

रिषभ पंतचे अर्धशतक 

09:39 PM

दिल्लीला पाचवा धक्का 

09:37 PM

शिखर धवन आऊट 

09:13 PM

दिल्लीला तिसरा धक्का 

09:07 PM

चौकारासह दिल्लीचे शतक पूर्ण 

08:24 PM

दिल्लीला दुसरा धक्का, श्रेयस अय्यर बाद 

08:11 PM

पृथ्वी शॉ बाद, दिल्लीला पहिला धक्का 

07:44 PM

मुंबई इंडियन्सचा संघ जाहीर 

07:38 PM

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली 

  


Web Title: IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.