IPL 2019 KXIP vs KKR live update, Kings XI Punjab VS Kolkata Knight Riders Match Score, Highlight, news in Marathi | IPL 2019 KXIP vs KKR : कोलकाताचा दणदणीत विजय, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
IPL 2019 KXIP vs KKR : कोलकाताचा दणदणीत विजय, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम

मोहाली, आयपीएल 2019 : घरच्या मैदानावर खेळताना शुबमन गिलने यजमान किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. ख्रिस लीन आणि गिल यांनी कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या साथीनं गिलने कोलकाताला विजयाच्या समीप आणले. लीन आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 62 धावा केल्या, तर गिल व रसेल यांनी 50 धावांची भागीदारी केली. या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर कोलकाताने शुक्रवारी 7  विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. शुबमनने 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 65 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने 9 चेंडूंत नाबाद 21 धावांची खेळी केली.

11:36 PM 

11:32 PM

IPL 2019 KXIP vsKKR : शुबमनचीघरच्यामैदानावरआतषबाजी, कोलकाताचाविजयhttps://t.co/UXOGFIY9fd@lionsdenkxip@KKRiders@RealShubmanGill#KXIPvsKKR

— Lokmat(@MiLOKMAT) May 3, 2019 

11:12 PM

आंद्रे रसेलच्या यंदाच्या आयपीएलमध्ये 500 धावा

11:11 PM

कुटुंबीयांनीही साजरे केले शुबमनच्या अर्धशतक... पाहा व्हिडीओ 

11:07 PM

15व्या षटकात रसेलला मोहम्मद शमीनं माघारी पाठवले. त्याने 14 चेंडूंत 24 धावा केल्या. 
 

11:02 PM 

11:02 PM

 14 धावांवर असताना आंद्रे रसेलला जीवदान मिळाले. टायच्या गोलंदाजीवर अग्रवालने सोपा झेल सोडला.  

10:56 PM 

10:55 PM 

10:46 PM 

10:45 PM

शतकी धावा केल्यानंतर पंजाबच्या कर्णधाराने उथप्पाला बाद केले. उथप्पाने 22 धावा केल्या. 
 

10:39 PM

रॉबीन उथप्पा आणि गिल या जोडीनं चांगली खेळी करताना संघाला 10च्या सरासरीनं धावा चोपून दिल्या.
 

10:25 PM

ख्रिस लीन आणि शुबमन गिल यांनी कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. लीनने पंजाबच्या गोलंदाजांना धुतले. त्यामुळे कोलकाताने पॉवर प्लेमध्ये 62 धावा केल्या, परंतु त्यांना लीनची विकेट गमवावी लागली. अँड्य्रु टायने त्याला बाद केले. लीनने 22 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह 46 धावा केल्या. 

09:45 PM 

09:35 PM

सॅम कुरनचा सोपा झेल रिंकुने सोडला तो क्षण...

09:33 PM

कर्णधार आर अश्विन भोपळा न फोडता माघारी परतला. आंद्रे रसेलने त्याला त्रिफळाचीत केले. 
 

09:29 PM

13व्या षटकात हॅरी गर्नीने कोलकाताला यश मिळवून दिले. त्याने मनदीपला ( 25) बाद केले.

09:25 PM 

09:25 PM

सुनील नरीनच्या गोलंदाजीवर रिंकुनं पंजाबच्या सॅम कुरनचा सोपा झेल सोडला. 
 

09:21 PM

09:20 PM 

09:09 PM

अग्रवालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु नरीनने त्याला धावबाद केले. अग्रवाल 26 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 36 धावा करून माघारी परतला. 

09:03 PM

निकोलस पूरणची विकेट पाहा

https://www.iplt20.com/video/185519

08:56 PM

पूरण आणि अग्रवाल या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांची 69 धावांची भागीदारी नितीश राणाने तोडली. 27 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 48 धावा करणाऱ्या पूरणला त्याने बाद केले.  

08:54 PM

किंग्स इलेव्हन पंजाबचे सलामीवीर माघारी पाठवल्यानंतरही कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना धावगतीवर चाप बसवता आला नाही. त्यामुळे संतापलेल्या कर्णधार दिनेश कार्तिकने स्ट्रॅटेजिक टाइम आऊटमध्ये आंद्रे रसेल व पीयूष चावला यांच्यावर राग काढला. रसेलने पहिल्याच षटकात 13, तर चावलाने 14 धावा दिल्या. 

08:32 PM

पॉवर प्लेमध्ये पंजाबच्या 2 बाद 41 धावा 

08:31 PM

पाहा लोकेश राहुल कसा बाद झाला

https://www.iplt20.com/video/185447/live-commentary-catch-lynn-s-juggling-act-

08:26 PM

त्यानंतर वॉरियरने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलचा अडथळा दूर केला. शुबमन गिलने सीमारेषेनजीक गेलचा झेल टिपला. गेलला 14 धावाच करता आल्या. 

08:21 PM

प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबसाठी ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी सावध खेळ केला. मात्र, संदीप वॉरियर्सच्या गोलंदाजीवर लोकेशला माघारी परतावे लागले. वॉरियर्सने टाकलेला स्लोवर चेंडूचा अंदाज बांधण्यात राहुल अपयशी ठरला आणि ख्रिस लीनने त्याचा सोपा झेल टिपला. पंजाबला 13 धावांवर पहिला धक्का बसला. 

07:51 PM

कोलकाता नाईट रायडर्स - ख्रिस लीन, शुबमन गिल, रॉबीन उथप्पा, नितीश राणा, दीनेश कार्तिक, आंद्रे रसेल, रिंकु सिंग, सुनील नरीन, पीयूष चावला, हॅरी गर्नी, संदीप वॉरियर्स

07:50 PM

किंग्स इलेव्हन पंजाब - लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, निकोलस पूरण, मनदीप सिंग, सॅम कुरन, आर अश्विन, मुरुगन अश्विन, अँड्य्रु टाय, मोहम्मद शमी, अर्षदीप सिंग

07:47 PM

ख्रिस गेलने आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध 48.84च्या सरासरीनं 16 डावांत 635 धावा चोपल्या आहेत. त्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.

07:41 PM

आंद्रे रसेल पंजाबची धुलाई करण्यासाठी सज्ज

07:36 PM 

07:34 PM

किंग्ल इलेव्हन पंजाब प्रथम फलंदाजी करणार 

07:23 PM

पंजाबच्या आर अश्विनने कोलकाताविरुद्ध 17 सामन्यांत 19 विकेट घेतल्या आहेत. फिरकीपटूनं कोलकाताविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

07:18 PM 

07:17 PM 

07:16 PM

किंग्स इलेव्हन पंजाबने मोहालीत खेळलेल्या मागील 8 सामन्यांत 7 विजय मिळवले आहेत. त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून हार पत्करावी लागली. 


Web Title: IPL 2019 KXIP vs KKR live update, Kings XI Punjab VS Kolkata Knight Riders Match Score, Highlight, news in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.