IPL 2019 : Kolkata Knight Riders (KKR) full schedule in Indian Premier League (IPL) 2019 | IPL 2019 : 'करबो लड़बो जीतबो रे'चा नारा घुमणार, कोलकाताचे 14 सामने कधी व कोठे होणार?
IPL 2019 : 'करबो लड़बो जीतबो रे'चा नारा घुमणार, कोलकाताचे 14 सामने कधी व कोठे होणार?

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 11व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सला अनेक भावनिक प्रसंगातून जावे लागले. प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुलीला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर दोन वेळा आयपीएल जेतेपद पटकावून देणाऱ्या गौतम गंभीरला संघातून डच्चू देण्यात आला. त्यानंतर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली  संघाने एलिमिनेटर सामन्यापर्यंत मजल मारली. यंदा मात्र केकेआर जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.

कोलकाता 24 मार्चला घरच्या मैदानावर माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबाद ( 2016) विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे आणि 5 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.   


कोलकाताचे सामने कधी व कोणते?
24 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
27 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता
30 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली
5 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
7 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, जयपूर
9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
12 एप्रिल :  कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
14 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
19 एप्रिल :  कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
21 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स, हैदराबाद
25 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
28 एप्रिल :  कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
3 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स, मोहाली
5 मे :  मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ
दिनेश कार्तिक ( कर्णधार), रॉबीन उथप्पा, ख्रिस लीन, शुबमन गिल, रिंकू सिंग, निखिल नाईक, जो डेन्ली, श्रीकांत मुंढे, कार्लोस ब्रेथवेट, आंद्रे रसेल, सुनील नरीन, नितीश राणा, पियुष चावला, कुलदीप यादव, संदीप वॉरियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, अॅनरीच नोर्टजे, हॅरी गर्नी, यारा पृथ्वीराज, केसी करिअप्पा.  


Web Title: IPL 2019 : Kolkata Knight Riders (KKR) full schedule in Indian Premier League (IPL) 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.